27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरराजकारणसंजय राऊत हे पवारांची सोंगटी

संजय राऊत हे पवारांची सोंगटी

राज ठाकरेंची सडकून टीका

Google News Follow

Related

संजय राऊत हे शरद पवारांची करवली आहे. अमंगल कार्याची करवली आहे. त्यांच्या उंबरठ्यावर बसून तिथेच आयुष्य झिजवणार. ते सोंगटी आहेत, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

मराठा आरक्षण, त्यांचे दौरे, मराठा आरक्षणाच्या मागे राहून महाराष्ट्रात जातीपातींना भडकावण्याचे राजकारण सुरू असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरात झालेल्या आपल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

हे ही वाचा:

भारतात आश्रय मिळविण्यासाठी बांगलादेशच्या सीमेवर हिंदू पाण्यात उभे

जरांगेंच्या आंदोलनामागून पवार, ठाकरे माथी भडकवतात!

बांगलादेशी हिंदू ढाक्याच्या रस्त्यावर !

ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कुस्तीची परंपरा कायम; अमन सेहरावतने जिंकले कांस्यपदक

राज ठाकरेंनी त्यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याविषयी संतप्त विधान केले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले की, पुढच्या काही महिन्यांत त्यांना दंगली घडवायच्या आहेत. विशेषतः मराठवाड्यात त्यांनी दंगली करायच्या आहेत.

माझ्या दौऱ्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण माझे मोहोळ उठले ना तर त्यांना निवडणुकांसाठी सभाही घेता येणार नाहीत. माझ्या नादी लागू नका. त्यांच्याकडे प्रस्थापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा