संजय राऊत कोणाचे, शिवसेना की राष्ट्रवादी?

संजय राऊत कोणाचे, शिवसेना की राष्ट्रवादी?

शिवसेनेसाठी खस्ता खाणाऱ्या आणि बंजारा समाज पक्षाच्या पाठिशी उभा करणाऱ्या संजय राठोड यांचा बचाव करण्यासाठी संजय राऊत कधीही पुढे आले नाहीत. मात्र, आता ते अनिल देशमुख यांचे भक्कम समर्थन करुन राष्ट्रवादी काँग्रेसची चाकरी इमाने-इतबारे करत आहेत. त्यामुळे संजय राऊत नक्की शिवसेना की राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.

प्रवीण दरेकर यांनी अनिल देशमुखांच्या चौकशीची गरज नाही, असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांचा समाचार घेतला. संजय राऊत यांचे वक्तव्य पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना प्रवक्ता केलंय की काय, अशी शंका वाटते. संजय राठोड यांचे कृत्य चुकीचेच होते. पण त्यावेळी संजय राऊत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले नाहीत. त्यावेळी चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा आवश्यक वाटला. तेव्हा चौकशीसाठी राजीनामा आवश्यक नाही, असे राऊत यांना सांगावेसे वाटले नाही. त्यावेळी राऊतांनी संजय राठोड यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का, हे माहिती नाही. मात्र, आता संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची पाठराखण इमाने-इतबारे करताना दिसत आहेत, अशी टिप्पणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का?- नाना पटोले

निर्लज्ज राहुल गांधी महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुखपदी शिवसेनेने शरद पवार यांचे नाव सुचवल्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाल्याचा दावा संजय राऊत यांनी फेटाळून लावला. यूपीए आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घकाळ यूपीएचे अध्यक्षपद भुषविले आहे. मात्र, सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसते. देशात वेगळ्या प्रकराच्या घडामोडी घडत आहेत. अशावेळी यूपीएचे नेतृत्त्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावे, असे देशातील अनेक पक्षांची म्हणणे आहे, असे ते म्हणाले.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) अध्यक्षपदावरून आता महाविकासआघाडीत नाराजीची ठिणगी पडली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यूपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव सुचवले होते. यावरुन काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना फटकारले. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version