‘जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल’

‘जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल’

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ४० पेक्षा जास्त आमदारांना घेऊन गुवाहाटीला दाखल झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह पुन्हा परत येतील असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. यादरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे. जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल, मात्र आम्ही लढू असे वक्त्यव्य संजय राऊतांनी केले आहे.

२१ जून रोजी एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे अनेक आमदार गुजरातला गेले होते. त्यांनतर पहिले तेरा आमदार सोबत असल्याची माहिती समोर आली त्यांनतर २३ आमदार सोबत आहेत, अशी माहिती समोर आली. या आमदारांना काल रात्री उशिरा आसाममधल्या गुवाहाटी इथं नेण्यात आलं आहे. त्यानंतर खुद्द एकनाथ शिदे यांनी ४० पेक्षा जास्त आमदार सोबत असल्याचा दावा केला आहे. यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. एकनाथ शिदेंसोबत वेळोवेळी संपर्क केला जात आहे. शरद पवार आणि माझ्यात चर्चा झाल्याची यावेळी राऊतांनी सांगितले आहे. शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पूर्ण पाठींबा आहे. शिवसेनेत राखेतून जन्म घेण्याची ताकद आहे. आमचे सर्व आमदार परत येतील, असाही त्यांनी दावा केला आहे. तसेच, जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल, पण प्रतिष्ठा हवी आहे, असे खळबळजनक विधान यावेळी त्यांनी केले आहे.

हे ही वाचा:

राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण

ठाकरे सरकार अडचणीत; ४० पेक्षा जास्त आमदार सोबत असल्याचा शिंदेंचा दावा

महिंद्रा ग्रुपनंतर ही कंपनी देणार अग्निवीरांना नोकरी

शिवसेनेचे ‘हे’ आमदार एकनाथ शिंदेंसोबत

दरम्यान, जे आमदार शिंदे यांच्यासोबत गेले आहेत त्यांच्या घरून तक्रार आली होती की, त्या आमदारांना तिकडे मारहाण केली जात आहे. त्यांना फसवून घेऊन गेले आहेत,अशी माहिती संजय राऊत यांनी दिली होती. मात्र,ते आमदार स्वखुशीने सोबत आले आहेत असे स्पष्ट एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

Exit mobile version