संजय राऊतांना चार दिवसांची ईडी कोठडी

संजय राऊतांना चार दिवसांची ईडी कोठडी

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने रात्री उशिरा शिवसेना खासदार संजय राऊतांना अटक केली होती. आज, १ ऑगस्ट रोजी संजय राऊतांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने संजय राऊतांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

ईडीने रात्री १ वाजता संजय राऊतांना अटक केली आणि सकाळी त्यांना जे.जे रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं होत. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा त्रास असल्याचं समोर आलं आहे. पुढे ईडीने संजय राऊतांना पीएमएलए न्यायालयात हजर केलं. ईडीने न्यायालयात संजय राऊतांच्या आठ दिवसांची कोठडीची मागणी केली होती. मात्र, पीएमएलएने राऊतांची प्रकृती लक्षात घेत त्यांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावणी आहे. ४ ऑगस्ट पर्यंत संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत असणार आहेत. संजय राऊतांना घरचं जेवण आणि औषध कोठडीत देण्यात येणार आहेत. तसेच साडे आठ ते साडे नऊ यादरम्यान राऊतांना भेटण्याची वेळ देण्यात आली आहे. याशिवाय त्यांची प्रकृती लक्षात घेऊन रात्री साडे दहा नंतर त्यांची चौकशी होणार नाही आहे.

हे ही वाचा:

कुणाला नको आहे संभाजीनगर, धाराशिव नामकरण?

संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख

शिवीगाळप्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या

आठ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक!

पत्राचाळ गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार संजय राऊत आहेत. प्रवीण राऊत यांना फक्त पुढे केलं होत, असा आरोप ईडीने संजय राऊतांवर केला आहे. ईडीने आठ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती मात्र, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची कोठडी दिली आहे.

Exit mobile version