टास्क फोर्सचे श्रेय केंद्राला देण्यास राऊत यांची कुरकुर

टास्क फोर्सचे श्रेय केंद्राला देण्यास राऊत यांची कुरकुर

“देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने ‘टास्क फोर्स’ स्थापन केला आहे.” असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. प्रत्यक्षात केंद्र सरकारनेच सर्वोच्च न्यायालयाला असा टास्क फोर्स स्थापन करण्याची विनंती केली होती. त्यामुळे केंद्राला लक्ष्य करण्याचा आणखी एक प्रयत्न राऊत यांनी केला आहे. “ऑक्सिजनशिवाय लोक मरत आहेत. महाराष्ट्रातही ऑक्सिजनचा तुटवडा होता, परंतु राज्य सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणली.” असे सांगताना केंद्र सरकारने केलेल्या ऑक्सिजन पुरवठ्याचा उल्लेख न करता स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. खरे तर, महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यावर केंद्र सरकारनेच ऑक्सिजन ट्रेन पाठवून ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढला होता. आंध्र प्रदेश आणि ओडिशातून महाराष्ट्रात ऑक्सिजनही आणले होते, हे मात्र संजय राऊत सोयीस्कररित्या विसरले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्स स्थापन करावा, अशी विनंती केंद्र सरकारनेच न्यायालयाला केली होती. केंद्र सरकारने ऑक्सिजन नियोजनासाठी अनेक राज्यांमध्ये संवाद आणि समन्वय साधला होता. रेल्वेचा वापर करत अनेक राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठाही जलद गतीने केला होता. याशिवाय केंद्र सरकारने अनेक देशांकडून ऑक्सिजन काँसंट्रेटर्स, टँकर्स मागवले आहेत. अजूनही परदेशातून ऑक्सिजनचा पुरवठा होतच आहे. या सर्व प्रयत्नातूनच आज देशातील अनेक राज्यांमधील ऑक्सिजनचा तुटवडा कमी झाला आहे.

हे ही वाचा:

राज्याच्या अधिकारातील सवलती तातडीने मराठा समाजाला द्या

संभाजी ब्रिगेडकडून राष्ट्रवादीला घरचा आहेर

२-१८ वयोगटातील मुलांसाठी होणार लसीची चाचणी

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावणार?

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गेले काही दिवस पॉझिटीव्ह केसेस झपाट्याने कमी होत आहेत. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेल्या आकडेवारीनुसार हे सिद्ध होत आहे की, चाचण्या कमी केल्यामुळे मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनावरील नियंत्रण आभासी आहे असेही फडणवीस म्हणाले.

Exit mobile version