सीडीएस बिपीन रावत यांचे तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले आहे. लष्कराच्या सर्वोच्च अधिकाऱ्याचा असा अपघाती मृत्यू झाल्याबाबत खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांसमोर आपले मत मांडले आहे.
या दुर्घटनेमागे अपघाताचे कारण नसून घातपाताची शंका व्यक्त केली जात आहे. त्याबाबत त्यांना विचारण्यात आले त्यावर, त्यांनी तसा अंदाज व्यक्त होत आहे, असे सांगितले. रावत यांच्या मृत्यूनंतर देशभरातून हा घातपात असेल अशी शक्यता व्यक्त केली जातेय. सध्या चीन सोबत तणावाची स्थिती आहे, पाकिस्तानच्या सीमेवर सुद्धा कुरापती सुरू आहेत, अशा वेळी देशाच्या सेनापतीचा मृत्यू होतो, त्यामुळे लोकांच्या मनात शंका असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. पण हा राजकीय विषय नसून हा देशाचा विषय आहे, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर
राष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली बिपीन रावत यांना श्रद्धांजली
पाकिस्तानमध्ये महिलांविरुद्ध तालिबानी अत्याचार
सीडीएस बिपीन रावत यांचे हेलीकॉप्टर अपघातात निधन
बिपीन रावत यांच्या अचानक अपघाती जाण्याने देश आणि सरकारही गोंधळले आहे, असे संजय राऊत म्हणाले. हा अपघात घडला तेव्हा आम्ही संसदेच्या आवारात गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करत होतो. आमचे आंदोलन सुरू असतानाच ही बातमी आली. त्यावेळी तिथेही काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता., असे राऊत यांनी सांगितले.
रावत यांच्या बद्दल बोलताना त्यांनी आठवणही सांगितली. रावत यांना भेटायचो तेव्हा त्यांना तुम्हीही पुस्तक लिहा असे सुचवायचो. तुमचे अनुभव लिहा असे सांगायचो. त्यावर ते म्हणायचे कोई राज राज होता है, राजही रहने दो, अशी आठवण संजय राऊत यांनी सांगितली.