केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या अहमदाबादमध्ये झालेल्या कथित भेटीमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांना वारंवार माध्यमांसमोर येऊन सरकारमध्ये सारे काही आलबेल असल्याचे सांगावे लागत आहे. त्यातच संजय राऊत यांनी अमित शाह आणि शरद पवार यांच्या बैठकी बाबत अर्ध्या तासात पलटी खाल्ली होती. आता तर त्यांच्या ट्वीटमुळे राऊत यांचा पुरता गोंधळ उडाल्याचे दिसुन येत आहे.
भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील त्यावरून राऊत यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी ट्वीट करत राऊत यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
हे ही वाचा:
भाजपा सर्वच्या सर्व तीस जागा जिंकेल
भाजपा-राष्ट्रवादी एकत्र येणार का? काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
भारतीय लष्कर आणि पोलिस दलाला कुपवाडा जिल्ह्यात मोठे यश
संजय राऊत यांनी ट्वीट करताना म्हटले होते की, काही गोष्टी वेळेतच स्पष्ट व्हाव्यात अन्यथा अफवा निर्माण होतात. मी विश्वासाने सांगू शकतो की, शरद पवार आणि अमित शाह यांच्यात अहमदाबाद किंवा कुठेही गुप्त बैठक झालेली नाही. आता तरी अफवांचा अंत करावा. यामुळे हाती काही लागणार नाही.
अतुल भातखळरांनी त्यांना सडेतोड उत्तर देताना म्हटले आहे की, काय वाईट परिस्थिती आली आहे संजय राऊतांची, शरद पवारांना ट्विटरवरून आवाहन करावे लागते आहे…. अहो जाऊन विचारा की पवार आणि पटेलांना.
काय वाईट परिस्थिती आली आहे संजय राऊतांची, शरद पवारांना ट्विटरवरून आवाहन करावे लागते आहे….
अहो जाऊन विचारा की पवार आणि पटेलांना. https://t.co/C0we38drKd— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 29, 2021
याबरोबरच भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील याबाबत सूचक विधान केले आहे. त्याबरोबरच त्यांनी संजय राऊतांच्या सातत्याने सर्वकाही ठिक आहे सांगण्याचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकार पाच वर्षे टिकेल असं म्हटलं आहे. त्यावर तुमचं काय मत आहे? असं चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आलं. तेव्हा, सरकार टिकेल हे का सांगावं लागतं? सरकार टिकेल हे सांगावं लागतं याचा अर्थ काही तरी गडबड आहे. माझी तब्येत बरी आहे, ती बरीच असते. ते सांगावं लागत नाही. ज्यावेली तब्येत बरी नसते तेव्हा तुमच्या लक्षात येतं. तेव्हा तब्येत बरी नाही हे सांगावं लागतं, असं सांगतानाच पवारांची तब्येत बिघडली आहे. सरकारचं मला माहीत नाही, असं चंद्रकांतदादा म्हणाले.