पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. पीएमएलए न्यायालयाकडून संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ईडीने संजय राऊत यांच्या जामीनला विरोध केला आहे. जामीनाविरोधात ईडी उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती आहे.
३१ जुलैला संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर राऊत यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पुढे राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला होता. राऊत यांना पुन्हा एकदा पीएमएलए न्यायालयात हजर केले होते. मागील सुनावणीमध्ये ईडीने लेखी उत्तर सादर केले होते. पण १०२ दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणामध्ये प्रविण राऊत आणि संजय राऊत या दोघांच्याही जामीन मंजूर करण्यात आला आहे. दोन लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. ईडीने उच्च न्यायालयात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ईडीच्या निर्णयावर आज दुपारी तीन वाजता निर्णय येणार आहे.
हे ही वाचा:
दीपाली सय्यद यांचा मुख्यमंत्री शिंदेंना पाठींबा
लाचार माजी मुख्यमंत्र्याच्या संतापाला विचारतो कोण?
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी घेतली नव्या सरन्यायाधीश पदाची शपथ
‘खोक्या’बद्दल लवकरच सुप्रिया सुळेंना नोटीस देण्याची तयारी
दरम्यान, पत्राचाळ गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार संजय राऊत आहेत. प्रवीण राऊत यांना फक्त पुढे केले होते, असा आरोप ईडीचा संजय राऊतांवर आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने भूखंड पत्रव्यवहार करूनही नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पत्राचाळीतील ६७२ कुटुंबांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी गुरु-आशिष कन्स्ट्रक्शनची नियुक्ती केली होती. मात्र या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर येथे राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.