संजय राऊतांच्या उलट्या बोंबा

संजय राऊतांच्या उलट्या बोंबा

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवार १९ डिसेंबर रोजी पुण्यातून शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. अमित शहा यांनी घातलेला हा घाव शिवसेनेला चांगलाच जिव्हारी लागला आहे. यावरूनच शिवसेना खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अमित शहा आणि भाजपच्या नावाने उलट्या बोंबा मारल्या आहेत.

सत्तेचा अधिक वाटा मिळावा यासाठी २०१४ मध्ये शिवसेनेला दूर ठेवण्याचा भाजपचा डाव होता अशी आरोळी राऊत यांनी ठोकली आहे. भाजपाने आमच्या विरोधात कट कारस्थान केले असून आम्ही सत्तेसाठी हपापलेला नव्हतो असे राऊत म्हणाले. भाजपाच्या एका नेत्यानेच शिवसेनेला या कटाची माहिती दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

अमित शहा यांचे वक्तव्य असत्याला धरून केलेले आहे. तर कालच्या भाषणात ते काय खरे बोलले हे शोधण्याचा मी प्रयत्न करत होतो असे राऊत म्हणाले. शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला नाही आणि पुढे सोडणारही नाही असे राऊत यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

मल्हार महोत्सव जपणार महाराष्ट्राची संस्कृती

‘घटिया आजम खान रोड’ झाला ‘अशोक सिंघल मार्ग’

सोने तस्करी करणाऱ्या १८ महिला विमानतळावर ताब्यात

 

तेलंगणामध्ये समलैंगिक पुरुष अडकले लग्नबंधनात!

२०१४ पासून महाराष्ट्रात पावलोपावली विश्वासघात करणारे कोण याचे उत्तर भाजपाने द्यावे असा उलटा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. २०१४ मध्ये आम्ही वेगळे लढलो होतो. प्रचंड ताकद पैसा आणि केंद्रीय सत्ता यांची कृत्रिम लाट असताना आम्ही प्रचंड ताकदीने लढलो असे राऊत यांनी म्हटले. तर भाजपाने ईडी, सीबीआय आणि एनसीबी यांची तीन चिलखते काढून मैदानात दोन हात करण्यासाठी उतरावे असे आव्हान राऊत यांनी दिले. आम्ही पाठीवर नाहीतर छातीवर वार करतो अशा वल्गनाही त्यांनी केल्या.

तर अमित शहा यांनी महाविकास आघाडीने एकत्रित लढून निवडून येऊन दाखवावे या दिलेल्या आव्हानाला राऊत यांनी प्रतिआव्हान दिले आहे. भाजपाने आपल्या १०६ आमदारांना राजीनामा द्यायला सांगून त्यांना पुन्हा निवडून आणून दाखवावे असे राऊत यांनी म्हटले आहे.

Exit mobile version