गुन्हेगारीच्या उत्पन्नातून राऊतांनी संपत्ती खरेदी केली!

गुन्हेगारीच्या उत्पन्नातून राऊतांनी संपत्ती खरेदी केली!

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणावर आज सुनावणी झाली. या घाेटाळ्यातील संशयित आरोपी शिवसेना खासदार संजय राऊत यांना चार दिवस अर्थात चार ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी पीएमएलए न्यायालयाने आज सुनावली. दिवसभर न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी दाेन्ही बाजूने जाेरदार युक्तीवाद करण्यात आला.

संजय राऊत यांनी गुन्हेगारीच्या उत्पन्नातून संपत्ती खरेदी केल्याचा आराेप केला तर संजय राऊतांच्या वकीलाने आपली बाजू मांडताना संजय राऊत यांच्यावर राजकीय हेतूने प्रेरित हाेऊन कारवाई हाेत असल्याचे म्हटले. न्यायालयात संजय राऊत यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील अशाेक मुंदरगी यांनी युक्तीवाद केला तर ईडीतर्फे हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद केला.

साेमवारी सकाळी संजय राऊतांना सत्र न्यायालयात हजर केले. संजय राऊत यांनी न्यायालयात जाताना मला आणि पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. न्यायालयात कोर्ट रूम नंबर १६ मध्ये न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर ईडीने रिमांडसाठी संजय राऊतांना हजर केले.याच न्यायालयात पत्राचाळ संदर्भातील सुनावणी सुरू आहे. त्यामुळे या न्यायालयात हजर करण्यासाठी विशेष कोर्टाची परवानगी, ईडीने कोर्टनंबर ५४ मधून न्यायाधीशांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवत संजय राऊतांना या कोर्टात हजर केले. आज संजय राऊतांचे वकील आणि ईडीकडून यांच्याकडून बाजू मांडली.

हे ही वाचा:

कुणाला नको आहे संभाजीनगर, धाराशिव नामकरण?

संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख

शिवीगाळप्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या

आठ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक!

न्यायालयाचा युक्तीवाद असा : संजय राऊत यांनी सहकार्य केले.आरोप गंभीर आहेत पण आठ दिवसांच्या कोठडीची गरज नाही.संजय राऊत यांना चार दिवस पोलिस कोठडी दिली.संजय राऊत यांची रात्री दहानंतर चौकशी करू नये. न्यायालयाने संजय राऊत यांना दिलासा दिला. त्यांना घरचे अन्न आणि औषधी पुरवण्याची मागणी वकीलांनी केली होती, ती न्यायालयाने मान्य केली.

Exit mobile version