देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा विजय…जखमी वाघिणीने एकहाती विजय खेचून आणला वगैरे शब्दांत पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आता मात्र याच ममतांवर नाराज आहेत. गोव्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी तृणमूल काँग्रेस आणि ममतांवर टीका केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून त्यांनी ममतांना धारेवर धरले आहे. ते लिहितात की, अस्थिर लोकांना घेऊन ममता बॅनर्जी यांना गोव्यातील नव्या सकाळचे स्वप्न पडले आहे. हे त्यांच्या प्रतिमेस शोभणारे नाही.” काँग्रेस पक्षाला आतापर्यंत झोडपून काढणाऱ्या शिवसेनेला आता मात्र काँग्रेसच्या गोव्यातील अस्तित्वाची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे काँग्रेसला ममता बॅनर्जींचा विरोध असल्याबद्दल राऊत यांना दुःख होते आहे.
” गोव्यात काँग्रेसचे अस्तित्व शिल्लक ठेवायचे नाही ही भूमिका पंतप्रधान मोदी किंवा भारतीय जनता पक्षाची असू शकते, पण भाजपशी लढणाऱ्या ममता बॅनर्जीही त्याच काँग्रेसविरोधी भूमिकेस पाठबळ देतात. याचा फायदा शेवटी कोणाला होणार? ” असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा:
रोज नव्या घोषणा करण्यापेक्षा एक काय ते ठरवा, लोकांना घाबरवू नका!
पाकिस्तानातील मुरी येथे बर्फवृष्टीमुळे वाहनांत अडकून पर्यटक मृत्युमुखी
बापरे!! म्हणून त्याने ११ वेळा घेतली कोरोना प्रतिबंधक लस
धबधब्यात अचानक काळकडा कोसळला; ७ मृत्युमुखी
काँग्रेस पक्षाकडे मागच्या निवडणुकीनंतर सतरा आमदार होते. ते आता फक्त दोन राहिले आहेत. बाकी सगळे पळून गेले. कारण गोव्यात काँग्रेसचे सक्षम नेतृत्व नाही. राष्ट्रीय भूमिका घेऊन गोव्यात निवडणुका लढवल्या जात नाहीत. दिल्लीच्या राजकारणाशी गोव्याचे नाते कधीच नव्हते. त्यामुळे तृणमूल, आपसारखे पक्ष बाहेरून येऊन गोव्याला धडे देत आहेत. ‘आप’चे लोक आता गोव्यात स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याचा प्रचार करीत आहेत,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
संजय राऊतांनी उत्तर प्रदेशातील काही जागांवर शिवसेना निवडणूक लढवणार असल्याचेही सांगितले आहे. त्याचबरोबर इतर राज्यातही महाविकास आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.