भारतीय जनता पार्टीकडून शिवसेनेची सातत्याने जनाब सेना म्हणून खिल्ली उडविली जात असल्यामुळे शिवसेनेचा संताप संताप होत आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मध्यंतरी शिवसैनिकांशी संवाद साधताना जनाब सेनेवरून संताप व्यक्त केला होता. आता शिवसेना खासदार संजय राऊतही त्यावरून उखडले आहेत. नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेला जनाब सेना म्हटले जाते तर मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जनाब संघ म्हटले तर चालेल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी जनाब बाळासाहेब ठाकरे असे म्हणणारे पोस्टर्स मुंबईत लावण्यात आले होते. त्यानंतर शिवसेनेला जनाब सेना म्हणत भाजपाने त्यांना वेळोवेळी लक्ष्य केले होते.
नागपूर येथे शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेसाठी आलेले असताना संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली.
ते म्हणाले की, भारतात २२ कोटी मुसलमान राहतात. त्यातले हजारो मुस्लिम भाजपाला आणि आम्हालाही मतदान करत असतील. नगपूरमध्ये आरएसएसचं मुख्यालय आहे. हिंदुत्वाचा विचार नेणारी ती एक संघटना आहे. अनेकवेळा मी त्यांच्याकडे आदराने पाहतो. पण आदरणीय सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लिम समाजाविषयी काही वक्तव्ये पाहिली तर त्यांनाही जनाब सेना म्हणणार का?
अनेकदा त्यांनी सांगितले की, मुस्लिम व हिंदूंचा डीएनए सारखाच आहे म्हणून ते जनाब सेना झाले का? आरएसएसचा राष्ट्रीय मुस्लिम मंच स्थापन केला म्हणून ते जनाब सेनेचे प्रमुख झाले का? तुम्ही अल्पसंख्याक सेल का काढला आहे? मग तुम्हाला मियाँ, खान म्हणायचे का? देशात कोट्यवधी मुस्लिम राहतात. अनेक राज्यपाल मुस्लिम आहेत. देशात फक्त धार्मिक विद्वेष करून राजकारण करत असाल तर तुम्ही रोज फाळणी करत आहात, असेही राऊत म्हणाले.
हे ही वाचा:
बुलडोझरच्या भीतीने आरोपीने केलं आत्मसमर्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदींही त्यांच्यापुढे झाले नतमस्तक
कंभोज यांच्या घराकडे आता पालिकेची वक्रदृष्टी
‘त्या’ धावणाऱ्या मुलावर झाले आनंद महिंद्र फिदा
राज्यातील अनेक नेत्यांवर ईडीच्या होत असलेल्या कारवाईबाबत संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांचा खुळखुळा झाला आहे. तो दाखवून घाबरवले जात आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त कारवाया होत आहेत. मी पण त्यातलाच एक बळी आहे. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसालाही घाबरवण्यात आले. एक वर्ष झाले त्यांना काही सापडले नाही. पश्चिम बंगालमध्येही सर्वाधिक कारवाया. ममतांच्या भाच्याला अभिषेक बॅनर्जी यांनाही बोलावले दिल्लीत.
यूपीएच्या काळात १० वर्षआंत २३ धाडी पडल्या आता २३ हजार धाडी पडल्या. तपास यंत्रणा कार्यकर्त्यांप्रमाणे वागत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र बंगालमध्ये सत्ता आणू असे त्यांना वाटते पण आम्ही वाकणार नाही मोडण्याचा तर प्रश्नच नाही.