मंगळवारी संजय राऊत यांची पत्रकार परिषद; यावेळी प्रश्नोत्तरे होणार का?

मंगळवारी संजय राऊत यांची पत्रकार परिषद; यावेळी प्रश्नोत्तरे होणार का?

गेल्या महिन्यात सभा कम पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट केल्याचा दावा करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना भवनात ८ मार्च रोजी ही पत्रकार परिषद होईल.

८ मार्चला सायंकाळी ४ वाजता ही पत्रकार परिषद शिवसेनाभवनात होणार असल्याचे संजय राऊत यांनी ट्विट करून जाहीर केले आहे.

१५ फेब्रुवारीला राऊत यांनी अशीच एक पत्रकार परिषद घेण्याचे जाहीर केल्यावर संपूर्ण दिवस प्रसारमाध्यमांनी या पत्रकार परिषदेचा खूप बोलबाला केला होता. प्रत्यक्षात त्यात संजय राऊत यांनी कोणतेही गौप्यस्फोट केले नाहीत. शिवाय, नंतर पत्रकारांना प्रश्नही विचारण्याची मुभा दिली नाही. त्यामुळे यावेळी तरी पत्रकारांना प्रश्न विचारता येणार आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

त्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या व त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना राऊत यांनी लक्ष्य केले होते. आता संजय राऊत कोणते गौप्यस्फोट करणार, कुणाची नावे घेऊन घोटाळे बाहेर काढणार याविषयी उत्सुकता आहे. मागे झालेल्या सभा कम पत्रकार परिषदेत त्यांनी साडेतीन जणांचे घोटाळे बाहेर करणार असल्याचे म्हटले होते. पण त्यानंतर अद्याप काहीही झालेले नाही.

हे ही वाचा:

निवडणूक आयोगाचे काही अधिकार मिळणार राज्य सरकारला

रशिया युक्रेन युद्धामुळे भारतीय रुपया घसरला!

‘शरद पवार मानाची अपेक्षा ठेवतात, तर दुसरीकडे बगल में छुरी घेऊन फिरतात’

अनिल देशमुख यांच्यासह आर्थर रोड तुरुंगात नवाब मलिकही

 

गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींवर राऊत या पत्रकार परिषदेत बोलणार का, याबद्दलही चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना झालेली अटक, मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर खात्याने टाकलेल्या धाडी हे विषय पत्रकार परिषदेत असणार का, हे आता पाहायचे.

Exit mobile version