संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंची तुलना प्रभू श्री रामांशी

ठाकरे गटाच्या राज्यव्यापी महाधिवेशनात केलं वक्तव्य

संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंची तुलना प्रभू श्री रामांशी

ठाकरे गटाचे नाशिकमध्ये राज्यव्यापी महाधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व खासदार आणि आमदार उपस्थित आहेत. या अधिवेशनात संजय राऊत यांनी भाषणात थेट उद्धव ठाकरे यांची तुलना प्रभू श्री रामांशी केली आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील डेमोक्रोसी हॉलमध्ये ठाकरे गटाचे राज्यव्यापी महाधिवेशन पार पडतं आहे.

संजय राऊत म्हणाले की, “श्री राम आणि शिवसेनेचे नाते असे आहे की, रामाचे जे धैर्य ते शिवसेनेचे धैर्य, रामाचे जे शौर्य तेच शिवसेनेचे शौर्य, आणि रामाचा जो संयम तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे. आमच्या शिवसैनिकांनी शौर्य होते म्हणून अयोध्येत जाऊन बाबरीचे घुमट पाडले आणि भारतीय जनता पक्षाकडे धैर्य नव्हते त्यामुळे बाबरी कोसळताच ते म्हणाले हे आमचे काम नाही. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे कडाडले आणि म्हणाले होय हे काम माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. हे बाळासाहेब ठाकरेंचे धैर्य.”

“शिवसेना नसती तर अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झालीच नसती. शिवसेनेचे वाघ तिकडे पोहोचले. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिकडे जाऊन प्राण प्रतिष्ठापना करता आली. लोक म्हणतात, रामाशी आमचं नातं नाही. जिथे हे अधिवेशन होत आहे ते धर्मक्षेत्र आहे. कुरुक्षेत्र आहे, कारण इथून आपण लढाई सुरू केली होती. लढाई आपण कुरुक्षेत्रातून सुरू करणार आहोत,” असंही संजय राऊत या महाअधिवेशनात म्हणाले.

हे ही वाचा:

मध्यप्रदेशातील कुनो पार्कमधील मादी ज्वाला चित्त्याने तीन शावकांना दिला जन्म!

एक कोटी घरांवर लागणार सौरऊर्जा यंत्रणा

शिकागोजवळ तीन ठिकाणी आठ जणांची गोळ्या झाडून हत्या

कोट्यवधींच्या सुवर्णदागिन्यांनी सजला रामलल्ला!

जो राम अयोध्येतला आहे, तोच राम पंचवटीतील आहे. उद्धव ठाकरे यांनी नाशिकची निवड केली त्याला फार महत्व आहे. दिल्लीतील रावणशाहीसमोर आम्ही झुकणार नाही, असंही राऊत म्हणाले. डरो मत, झुको मत आणि सत्याच्या मार्गाने चलो. आपण इथून लढण्याची सुरुवात करत आहे. श्रीरामाने संधीची वाट पहिली तसच उद्धव ठाकरे संधीची वाट पाहत आहेत. राम संघर्ष करून बाहेर आला आणि तो भगवान झाला, असेही संजय राऊत म्हणाले.

Exit mobile version