उद्धव ठाकरे दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीगाठी करायला गेले त्यावरून महाराष्ट्रातील महायुतीने टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केली आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेस नेत्या सोनिया गांधींसमोर लोटांगण घालायला गेले होते, अशी टीका करण्यात आली. त्यावर संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत गेले ते काय लोटांगण घालायला गेले होते का?
उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबतचे एक कार्टून ठाण्यात झळकले. त्यातील व्यंगचित्रात उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांच्यासमोर लोटांगण घालताना दिसत आहेत. त्यावर घालीन लोटांगण, वंदिन चरण असेही लिहिले आहे. त्यावरून संजय राऊत हे संतापले.
एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर का जातात असा प्रश्न उपस्थित करत त्यांनीही लोटांगण घातले म्हणून ते मुख्यमंत्री झाले असे राऊत म्हणाले.
राऊत म्हणतात की, दिल्ली ही देशाची राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत गेले ते काय लोटांगण घालायला गेले नव्हते. पेशव्यांनी दिल्लीत जाऊन दिल्ली जिंकली, ते लोटांगण घालायला नव्हे. यशवंतराव चव्हाण दिल्लीच्या मदतीला गेले ते लोटांगण घालायला नव्हे.
राऊत एकनाथ शिंदेंवर टीका करताना म्हणाले, की, तुमच्या आधीपासून आम्ही दिल्लीत आहोत. सोनिया गांधींच्या पाठिंब्यामुळे तुम्हीही मंत्रिमंडळात होतात हेही लक्षात घ्या.
विनेश फोगाट भाजपामुळे हरली!
पत्रकारांनीही संजय राऊत यांना प्रश्न विचारला की, उद्धव ठाकरे दिल्ली दौरा करतात मग आता कुठे गेला महाराष्ट्राचा बाणा…त्यावर संजय राऊत संतापले आणि म्हणाले की, दिल्ली काय भाजपाच्या बापाची आहे काय? उद्धव ठाकरेंना आम्ही आमंत्रण दिले होते. इथे येऊन त्यांनी कपिल सिब्बल यांचीही भेट घेतली त्यांच्या घरी कला, साहित्य याविषयी आम्ही चर्चा केली. उद्धव ठाकरे हे कलाकार आहेत. भाजपाचा साहित्य, कला यांच्याशी काय संबंध आहे. त्यामुळेच विनेश फोगाट हरली.