24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणसंजय राऊत अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात- चंद्रकांत पाटील

संजय राऊत अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात- चंद्रकांत पाटील

Google News Follow

Related

“संजय राऊत अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही देऊ शकतात” अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना कानपिचक्या लगावल्या. बेळगावातील मराठी बांधवांना मदत करता येत नसेल तर किमान मराठी मतदारांमध्ये तोडफोड करु नका, असा सल्ला राऊतांनी गडकरींना दिली होता.

“संजय राऊत यांचं कसं आहे, की अमेरिका, इंग्लंड, बेळगांव हे त्यांना माहिती असतं. आम्ही सामान्य माणसं आहोत. संजय राऊत ते कोणालाही सल्ला देऊ शकतात. अमेरिकेच्या, इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देतात, तर ते गडकरींनाही देऊ शकतात” असा टोला चंद्रकांतदादांनी लगावला.

बेळगावातील लोकसभा पोटनिवडणुकीत मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये, असे संजय राऊत म्हणाले होते. मात्र, आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी बेळगावात भाजपाच्या प्रचारासाठी येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा:

कोविडच्या काळात ‘या’ कंपन्यांमध्ये हजारो नव्या नोकऱ्या

देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही- डॉ. हर्षवर्धन

वाशीमध्ये उपचारादरम्यान तरुणीवर बलात्कार?

मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक प्रशासन मुजोर- अतुल भातखळकर

आम्ही आणि त्यांनीही अहंकार कधी दाखवू नये. कालचक्र नेहमी फिरत असतं. पंधरा वर्ष त्यांचं सरकार होतं, मग आमचं आलं, पुन्हा त्यांचं आलं, पुन्हा आमचं गेलं, त्यांचं आलं, त्यांना नीट माहिती आहे की सरकार केव्हा जाणार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढण्याकरता अशी धडपड त्यांना करावी लागते. आम्ही मात्र सातत्याने सरकारच्या विरोधात संघर्ष करतोय. काल दिलेलं पॅकेजही आम्ही वर्षभर पाठी लागल्यावर फुटकं तुटकं दिलेलं आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा