भाजपाने देशात मिळविलेल्या यशानंतर ही सगळी ईव्हीएम मशीनची किमया असल्याचा कांगावा विरोधक करू लागले होते. गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही असा कांगावा केला आहे.
मशीनमध्ये गडबड करून करून किती करणार. आपण वेट अँड वॉचची भूमिका घेणे योग्य ठरेल, असे राऊत म्हणाले. गुजरातच्या या निवडणुकीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचंड प्रचारदौरे केल्यानंतर विरोधकांना मळमळू लागले आहेत. संजय राऊत यांनी त्यावर म्हटले आहे की, तीन टर्म गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे तरीही निवडणूक जिंकण्यासाठी मोदींना मेहनत घ्यावी लागते आहे. भाजपाने कुठल्याही प्रचाराशिवाय निवडणूक लढविली पाहिजे. निवडणूक यंत्रणेवर विश्वासच नसल्याचे राऊत म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
अमेरिकेतही गुजरात निवडणुकीची रणधुमाळी, कार रॅलीतून भारतीयांचे समर्थन
दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींच्या यात्रेला म्हटलं ‘बारात’
लंडनमध्ये त्यांना वडापाव पावला!
कांदळवनाच्या कत्तलीबाबत तक्रार करणाऱ्या वॉर्ड अध्यक्षासह महिलेला मारहाण
गुजरातमध्ये ५ डिसेंबरला दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून या निवडणुकीचा निकाल ८ डिसेंबरला लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १४ जिल्ह्यांमध्ये ९३ जागी मतदान होणार आहे. त्यात बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरवली, गांधीनगर, अहमदाबाद, आणंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा, छोटा उदेपूर याठिकाणी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक आघाडीच्या नेत्यांनी येथे मतदान केले.
भारतात नरेंद्र मोदी यांचे सरकार २०१४ला आल्यानंतर ईव्हीएमच्या मुद्द्यावरून बरीच टीका करण्यात आली. या मशीनमध्ये गडबड आहे. कुठल्याही बटणावर बोट ठेवताच मत भाजपालाच मिळते, असे आरोप केले गेले. प्रत्यक्षात ज्यांनी हे आरोप केले त्यांनीही नंतर विविध निवडणुकांत आपले उमेदवार जिंकून आणले किंवा सरकारेही स्थापन केली मात्र त्यावेळी ईव्हीएमचा वापर योग्य ठरला. केवळ भाजपाने विजय मिळविल्यानंतर ईव्हीएममध्ये दोष असल्याचे आरोप झाले.