भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. माझगांव न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी संजय राऊत हे आपले भाऊ आमदार सुनील राऊत यांच्यासोबत न्यायालयात हजर झाले होते. तर, दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या हे देखील सुनावणीसाठी उपस्थित होते. यावेळी न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला.
किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात यापूर्वी संजय राऊत यांना १५ दिवासांची कोठडी सुनावली होती. पण, ती शिक्षा आता न्यायालयाकडून स्थगित करण्यात आली आहे. या प्रकरणात ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ३१ जानेवारी २०२५ ला होणार आहे.
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात दंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवत संजय राऊतांना १५ दिवसांची कोठडी आणि २५ हजारांचा दंड देखील ठोठावला होता. याच प्रकरणी संजय राऊत यांच्या अपील अर्जावर आज माझगांव सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. संजय राऊत हे काल स्वतः न्यायालयात उपस्थित नव्हते. हा मुद्दा उपस्थित करत मेधा सोमेय्या यांच्या वकिलांनी अपील याचिकेला विरोध केला होता. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, अशी टिपण्णी न्यायालयाने संजय राऊतांसाठी केली होती. जामीन अर्जच्या सुनावणी वेळी अपीलकर्ता स्वतः हजर राहणे गरजेचं आहे, असा युक्तिवाद मेधा सोमय्या यांच्या वकिलांनी काल केला होता. त्यानंतर आज पुन्हा सुनावणी पार पडली.
हे ही वाचा :
“भारत आणि जर्मनीमधील मैत्री प्रत्येक टप्प्यावर, आघाडीवर अधिक घट्ट होतेय”
देशांतर्गत राजकीय फायद्यासाठी ट्रूडो सरकार खालिस्तानी दहशतवाद्यांना संरक्षण देतंय
पुण्यानंतर आता अहमदाबादमध्ये घुसखोर बांगलादेशी सापडले!
हरयाणा विधानसभा अध्यक्षपदी हरविंदर कल्याण यांची निवड होणार
प्रकरण काय?
मिरा- भाईंदर महापालिकेकडून शहरात सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली. त्यापैकी १६ शौचालयं बांधण्याचे कंत्राट भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला देण्यात आले होते. बनावट कागदपत्र सादर करुन मेधा सोमय्या यांनी मीरा- भाईंदर पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणी मेधा पाटकर यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी मानत १५ दिवसांची कोठडी आणि २५ हजारांचा दंड सुनावला.