शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करावे याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या चर्चेला निमित्त ठरले आहे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारणीत पारित करण्यात आलेला ठराव. पण आता याविषयी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. शिवसेनेने याबाबत आपली भूमिका फार आधीच मांडली असून या प्रस्तावाचे आम्ही स्वागतच करतो असे राऊत यांनी म्हटले आहे. बुधवार ३० मार्च रोजी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
मंगळवार, २९ मार्च रोजी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक आघाडीची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. खुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीत ही संपूर्ण बैठक पार पडली. यावेळी शरद पवारांना युपीएचे अध्यक्ष करावे असा ठराव मांडण्यात आला आणि तो संमतही झाला. विशेष म्हणजे या प्रस्तावाची मांडणी शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.
हे ही वाचा:
कोकण रेल्वेची धमाकेदार कामगिरी! पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक
आदित्य ठाकरे यांच्या सूचनेला बारसू ग्रामस्थांचा विरोध
महाविकास आघाडीचे आणखीन २ नेते तुरुंगात जाणार?
जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर पेट्रोल बॉम्ब हल्ला
याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सकारत्मक प्रतिक्रिया दिली आहे. ही चांगली गोष्ट आहे असे म्हणत या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. शरद पवार या देशातले ज्येष्ठ नेते आहेत आणि देशातील विरोधी पक्षांची एकजूट आपल्याला करायची असेल, अनेक राज्याचे बिगर भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री त्यांना एकत्र राहायचं असेल तर नक्की शरद पवार हे काम करू शकतात. त्यांच्याविषयी सगळ्यांच्या मनात खात्री असल्यामुळे या भूमिका सातत्याने समोर येत आहेत आणि आम्ही तरी फार पूर्वीच ही भूमिका मांडलेली आहे.