तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात कुजबुजले; प्रश्नोत्तरे नकोत!
शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषद कम सभेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांना प्रश्न विचारण्याची संधी दिली नव्हती. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राव मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले असतानाही संजय राऊत यांनी प्रश्नोत्तरे नकोत अशी भूमिका घेतली. त्यांचा तसा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
केसीआर राव, उद्धव ठाकरे यांच्यासह पत्रकारांसमोर खुर्च्यांवर बसलेले असताना संजय राऊत राव यांच्या कानात कुजबुजतात की, नो क्वेश्चन आन्सर. तेव्हा राव पुन्हा एकदा त्यांना विचारतात की, काय म्हणालात? तेव्हा राऊत पुन्हा एकदा त्यांना कानात सांगतात की, नो क्वेश्चन आन्सर.
संजय राऊत यांना प्रश्नांची लै भीती वाटू लागली आहे… pic.twitter.com/OKbpRlYfgV
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 20, 2022
त्यावरून भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे की, संजय राऊत यांना प्रश्नांची लै भीती वाटू लागली आहे…
हे ही वाचा:
न्यायालयाच्या बाहेर वाहनांमध्ये बसून नोटरी व्यवसाय नको!
ठाकरे-राव भेट! तिसऱ्या आघडीच्या उचक्या पुन्हा सुरु
घरातून पाच लाख चोरून पळालेली दोन मुले अटकेत
नारायण राणे यांच्या बंगल्यावर कारवाईचे आदेश
शिवसेना भवनात संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्याची संधीच पत्रकारांना दिली नव्हती. केवळ भाषण केल्याप्रमाणे त्यांनी आरोप केले आणि नंतर त्यांनी प्रश्नोत्तरे नाहीत असे सांगत काढता पाय घेतला. भाजपावर आरोप करण्यासाठी संजय राऊत यांनी ती पत्रकार परिषद घेतली होती. भाजपाच्या साडेतीन लोकांचे घोटाळे ते उघड करणार होते, पण प्रत्यक्षात तसे काहीही त्यांनी जाहीर केले नाही. त्यावर पत्रकार प्रश्न विचारतील या भीतीपोटी त्यांनी प्रश्नोत्तरांवरच काट मारली. आता पुन्हा एकदा त्यांनी राव यांना प्रश्नोत्तरे नकोत, असे सांगत प्रश्नोत्तरांची भीतीच वाटत असल्याचे जाहीर केले आहे.
संजय राऊत यांच्या या वागण्यावर टीका होत आहे. पत्रकार परिषद बोलावल्यावर पत्रकारांना प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि त्यांच्या प्रश्नांना जमेल तेवढी उत्तरेही देता आली पाहिजेत. पण प्रश्नोत्तरे होणार नाहीत आम्ही आमची बाजू मांडू ती छापा किंवा दाखवा ही भूमिका योग्य नाही, अशी टीका राऊत यांच्यावर केली जाऊ लागली.