संजय राऊतांना पुळका, म्हणे नरेंद्र मोदींनी मुस्लीम मंत्री का नाही बनवला?

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा कारभार स्वीकारला असून शपथ घेतलेल्या मंत्र्यांनाही खातेवाटप झाले आहे

संजय राऊतांना पुळका, म्हणे नरेंद्र मोदींनी मुस्लीम मंत्री का नाही बनवला?

लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा कारभार स्वीकारला असून शपथ घेतलेल्या मंत्र्यांनाही खातेवाटप झाले आहे. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पोटात मात्र पोटशूळ उठल्याच्या चर्चा आहेत. मंत्रिमंडळात एकही मुस्लीम मंत्री का नाही? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत असं म्हणाले की, आता आम्ही नरेंद्र मोदींना प्रश्न विचारणार नाही. नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडूंना प्रश्न विचारणार, कारण त्यांच्यामुळेच एनडीएचे सरकार आहे. या दोघांची मेहरबानी असेपर्यंत केंद्रात मोदींचे सरकार आहे. नरेंद्र मोदींनी स्वत:चं सरकार स्थापन केले नाही. निवडणूक प्रचारात त्यांनी आपलं रुप स्पष्ट केले. मोदींना देशात हिंदू मुस्लिम करायचे आहे. मोदींना वाटतेय की मुस्लिमांनानी मत केले नाही, त्यामुळे एकही मुस्लिम मंत्री नाही. पण हे संविधानाच्या विरोधात आहे. पंतप्रधान एका जातीचा नसतो, तो सर्व जाती-धर्माचा असतो. आम्ही नितीशकुमार आणि चंद्राबाबूंना हे मान्य आहे का? हा प्रश्न त्यांना विचारणार आहे. नितीशकुमार आणि चंद्राबाबू यांनी आपल्या कोट्यातून मुस्लीम मंत्री का नाही बनवला? त्यांच्यावर दबाव होता का? असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रपती भवनात शपथविधीदरम्यान दिसलेला प्राणी बिबळ्या नव्हेचं!

अनिल असल्याचे भासवत खलीलचा हिंदू महिलेवर बलात्कार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ५०० वर्षे जुनी ब्राँझची मूर्ती भारताला परत करणार!

बिहारमधील अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

तसेच ते पुढे म्हणाले की, “शरद पवार भटकती आत्मा आहे तर केंद्र सरकारमध्ये दोन अतृप्त आत्मे आहेत. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोन अतृप्त आत्म्यांचं तुम्ही समाधान करा. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाच्या पदावरून हटवत नाही तोपर्यंत आमच्या आत्म शांत होणार नाही,” असे संजय राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी आणि आमित शाह हे इतरांच्या ताकदीला प्रचंड घाबरतात. केंद्रीय यंत्रणा या मोदी-शाहांचा आत्मा आहेत, त्यांना बाजूला केल्यास एक मिनिट आमच्यासमोर टिकणार नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Exit mobile version