हक्कभंगप्रकरणी संजय राऊत यांचा खुलासा समाधानकारक नाही, म्हणून…

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सभागृहात माहिती; सदर प्रस्ताव आता राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला आहे.

हक्कभंगप्रकरणी संजय राऊत यांचा खुलासा समाधानकारक नाही, म्हणून…

संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्तावाच्या संदर्भात मोठी बातमी आहे. शनिवारी विधान परिषदेत संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. संजय राऊत यांनी हक्कभंग प्रस्तावाच्या नोटिशीला दिलेलं उत्तर समाधानकारक नसल्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात सांगितले. संजय राऊत यांचे हक्कभंग प्रकरण पुढील कारवाईसाठी प्रस्ताव आता राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले असल्याचे सभापती नार्वेकर यांनी सभागृहात सांगितले. हक्कभंगावर कोणताच दिलासा मिळाला नसल्याने आता संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे.

महाराष्ट्रातील विधिमंडळावर टीका करताना संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या विधानभवनात उमटले. राऊत हे राज्यसभेचे खासदार असल्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला गेला असून शनिवारी हा प्रस्ताव विधान परिषदेत सादर करण्यात आला. तसेच सदर प्रस्ताव आता राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर असतांना विधिमंडळ नव्हे हे चोरमंडळ आहे असं वादग्रस्त विधान केलं होतं. संजय राऊत यांच्या या वादग्रस्त विधानाचे जोरदार पदर उमटले. थेट विधिमंडळावरच आरोप केल्यामुळे वातावरण तापले. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणी राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्तावाची मागणी केली होती. आमदार भातखळकर यांनी संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील विधिमंडळाचा, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी संजय राऊत यांना हक्कभंग नोटीस बजावण्यात आली होती. त्याच दिवशी संध्याकाळी संजय राऊत यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली.

हे ही वाचा:

परदेशातल्या खलिस्तान समर्थकांचे पासपोर्ट होऊ शकतात रद्द, नातेवाईकांवरही कारवाई

केरळच्या महिलेने राहुल गांधींसाठी सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव

मी महाराष्ट्राची मुलगी, आज माहेरी आल्यासारखे वाटते आहे!

ओमानमधील भर कार्यक्रमात झाकीर नाईकने हिंदू महिलेला केले धर्मांतरित

संजय राऊत यांना हक्कभंगाची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी उत्तर देण्यासाठी मुदत मागितली होती. संजय राऊत यांनी पुढील दोन आठवड्यात सदर नोटीशीला उत्तरं दिली. आपल्या खुलाशामध्ये संजय राऊत यांनी आपण मी विधिमंडळाला नव्हे तर विधिमंडळातील एका गटाला चोर म्हणालो, असं स्पष्टीकरण दिलं होतं . संजय राऊत यांनी दिलेलं स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे सांगत सभापती नार्वेकर यांनी हक्कभंग प्रकरण पुढील कारवाईसाठी राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपतींकडे वर्ग करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

Exit mobile version