गमछा फिरवत राऊत ईडीच्या कार्यालयात दाखल

गमछा फिरवत राऊत ईडीच्या कार्यालयात दाखल

‘मी झुकणार नाही, सेना सोडणार नाही’

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज, ३१ जुलैला ईडीने नऊ तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना फोर्ट येथील ईडी कार्यालयात नेण्यात आले. यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. शिवसेनेला मोडण्यासाठी आणि कमजोर करण्यासाठी माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. यावेळी संजय राऊतांनी पुष्पा चित्रपटातील झुकेंगे नही हा डायलॉग मारला आहे.

माझ्या घरी कोणतेही कागदपत्र सापडलेली नाहीत, असे राऊत म्हणाले. मी घाबरत नाही, शिवसेना पक्ष माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी उद्धव ठाकरे आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. शिवसेनेसाठी मी बलिदान देण्यास तयार आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

ईडीचे अधिकारी पहाटे माझ्या घरी आले. माझ्या घरी त्यांना कोणतीही कागदपत्रे मिळालेली नाहीत. मी अशा कारवायांना घाबरत नाही, याहीपेक्षा मोठे स्फोट मी करेल, असा गौप्यस्फोट यावेळी संजय राऊतांनी केला आहे. मला अटक करत आहेत आणि मी अटक करून घेत आहे, असं त्यांनी ईडी कार्यालयाच्या इथे पोहचल्यावर माध्यमांना सांगितले आहे.

हे ही वाचा:

नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात 

‘संजय राऊतांची जागा नवाब मलिकांच्या शेजारी’

‘शिवसेना कुणाची’ याची सुनावणी ३ ऑगस्टला

एनआयएने सहा राज्ये पिंजून काढली; दोघांना घेतलं ताब्यात

रविवार, ३१ जुलैला ईडीचे पथक संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी दाखल झाले होते. नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले. यावेळी संजय राऊत यांनी भगवा गमछा परिधान केला होता. समर्थकांकडे बघून राऊतांनी गमछा हवेत फिरवला आणि मग ईडीच्या कार्यालयात संजय राऊत दाखल झाले.

Exit mobile version