ठाकरे सरकारचे तोंड काळे करून वनमंत्री संजय राठोड याने राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्याने आपला राजीनामा सुपूर्त केला आहे. पण राजीनामा दिल्यानंतरही त्याने ‘गिरे तो भी टांग उपर’ या स्वरूपाचा पवित्रा घेतला आहे. राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना राठोड याने आपली बाजू मांडली. पुजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यामुळे राजीनाम्याची नामुष्की ओढावलेले संजय राठोड याने माध्यमांशी बोलताना सर्व दोष विरोधी पक्षाच्या माथी मारला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मी राजीनामा सुपूर्त केला आहे. आमच्या बंजारा समाजाची तरुणी पूजा चव्हाण हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. विरोधकांनी त्या मृत्यूचे वाईट राजकारण केले आहे. माझी आणि माझ्या समाजाची बदनामी करण्याचे घाणेरडे राजकारण विरोधकांकडून होत आहे. अशी प्रतिक्रिया राठोड याने माध्यमांशी बोलताना दिली आहे.
हे ही वाचा:
संजय राठोडच्या राजीनाम्याच्या मागणीला घेऊन भारतीय जनता पार्टी सुरवातीपासूनच आक्रमक होती. या मुद्द्यावरून महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच गाजणार असे दिसत होते. पण आता अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच संजय राठोड याने राजीनामा दिला आहे. पण तरीही विधिमंडळात संजय राठोड विषयावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे.