‘मला क्लिन चीट मिळालेली आहे’

‘मला क्लिन चीट मिळालेली आहे’

संजय राठोड यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी शिंदे फडणवीस सरकराच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यांच्या या मंत्रिमंडळात शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी सुद्धा शपथ घेतली आहे. संजय राठोडांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे त्यांना विरोध केला होता. त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप झाले. अखेर संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येऊन याचे स्पष्टीकरण दिले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी माझी चौकशी झाली आणि मला क्लीन चिट मिळाली आहे, असे संजय राठोड यांनी स्पष्ट सांगितले आहे.

गेल्या १५ महिन्यांपासून मी आणि माझं कुटुंब मानसिक तणावात होतो. अशा प्रसंगामधून खरंतर कुणीही जावू नये. कारण या प्रसंगातून मी गेलो आहे. मी गेल्या तीस वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक जीवनात आहे. माझं राजकीय कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न झाला असल्याचे संजय राठोड म्हणाले आहेत. पोलिसांनी मला क्लीन चीट दिली आहे. मी निष्कलंक आहे. संबंधित प्रकरणात माझा काहीही हस्तक्षेप होता असं काही समोर आलेलं नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी मला परत संधी दिली आहे. त्यामुळे मी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे, असंही संजय राठोड म्हणाले आहेत.

ही वाचा:

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती स्थिर

जेवणाचा डबा घेऊन परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

परवानगी घ्या मग संजय राऊत यांना भेटा!

आमिर खानने ‘तिला’ का सॅल्यूट केला नाही?

संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते. संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप झाला होता. त्यावरून त्यांची महाविकास आघाडी सरकारमधून हकालपट्टी झाली होती. पण आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यातून चित्रा वाघ यांनी व्हीडिओच्या माध्यमातून आपली नाराजी जाहीर केली. मात्र, आता संजय राठोड यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

Exit mobile version