राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार

राज्यसभेसाठी शिवसेनेने आपल्या दुसऱ्या उमेदवाराची घोषणा केलेली असून आता कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना खासदारकीसाठी लढण्याची संधी शिवसेनेने दिली आहे. कोल्हापूरचे संजय पवार यांचे नाव शिवसेनेने जाहीर केले आहे. राज्यसभेसाठी संभाजीराजे छत्रपती यांना पर्याय शोधत असताना संजय पवार यांचे नाव समोर आले आहे.

शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राज्यसभेची उमेदवारी देता येणार नाही, या अटीवर शिवसेना ठाम असल्याने छत्रपती संभाजीराजे यांचा राज्यसभेचा मार्ग खडतर झाला होता. शिवबंधन बांधा आणि उमेदवारी घ्या, अशी अट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना घातली होती. मात्र, संभाजीराजेंनी नकार दिल्यानंतर शिवसेनेकडून संजय पवारांचे नाव देण्यात आले.

हे ही वाचा:

आशा भोसले म्हणतात, पिझ्झा खाण्यापेक्षा भाकरी खा!

‘यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचा उजवा हात’

बांगलादेशी मतदार तृणमुलच्या उमेदवार

‘पिझ्झा खाण्यापेक्षा भाकरी खा’

संजय पवार हे जिल्हाप्रमुख असून त्यांची ओळख कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित आहे. तीन वेळा ते कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. संजय पवारांचे नाव गेले २० वर्षे कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार म्हणून घेतले जाते. पण प्रत्यक्षात त्यांना संधी मिळाली नाही. गेले ३३ वर्षे कट्टर शिवसैनिक असणाऱ्या संजय पवारांचे नाव थेट राज्यसभेचा उमेदवार म्हणून चर्चेत आले आहे. शिवसेनेने अनेकदा सामान्य कार्यकर्त्याला संधी देत धक्कातंत्राचे राजकारण केले आहे. यामध्ये आता पवारांची वेळ आली आहे. त्यांना जर संधी मिळाली तर सेनेत सामान्य शिवसैनिकही मोठा होऊ शकतो याचा नवा पुरावाच मिळेल, असं बोललं जात आहे.

Exit mobile version