“घाबरू नका लढत रहा असं सांगत राहुल गांधी स्वतः अमेठीतून पळून गेलेत”

संजय निरुपम यांची राहुल गांधींवर सडकून टीका

“घाबरू नका लढत रहा असं सांगत राहुल गांधी स्वतः अमेठीतून पळून गेलेत”

काँग्रेस नेते राहुल गांधी हे वायनाड बरोबरच रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेसने चर्चेत असलेल्या अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केल्या. यावरून राहुल गांधी यांच्यावर टीका होत असून आता काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनीही राहुल गांधींवर सडकून टीका केली आहे.

संजय निरुपम म्हणाले की, “राहुल गांधी हे भारतातल्या तरुणांना सांगत असतात घाबरू नका, लढा. पण, आता असं वाटत आहे की राहुल गांधी हे पराभव होईल या भीतीनं अमेठीमधून पळून गेले आहेत. ज्या पद्धतीनं राहुल गांधी अमेठीतून पळून गेले आहेत. त्यामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांचं नैतिक बळ कमी होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या दोन जागा आहेत अमेठी आणि रायबरेली; यावर असं दिसतंय की राहुल गांधींनी ‘वारसा कर’ लावला आहे आणि फक्त रायबरेली मतदारसंघ सोबत ठेवला आहे,” अशी सडकून टीका त्यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी तर, अमेठीतून किशोरीलाल शर्मा रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसने शुक्रवारी त्यांच्या नावांची यादी जाहीर केली. अमेठी आणि रायबरेली हे दोघेही काँग्रेसचे गड राहिले आहेत. मात्र राहुल गांधी यांना सन २०१९मध्ये भाजपनेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पराभवाची धूळ चारली होती.

हे ही वाचा:

आमदार किरण सरनाईकांच्या भावाच्या कारला अपघात, पाच जणांचा मृत्यू!

ऑनलाईन फसवणुकीसाठी गुन्हेगार लढवत आहेत नवी शक्कल!

‘सीबीआय’ भारतीय संघराज्याच्या नियंत्रणाखाली नाही

पाकिस्तानातील सिंधी समाज करणार ‘राम लल्लाचा जयघोष’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (३ मे) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रायबरेली उमेदवारीवरून टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, शहजादे यांना माहित आहे की ते वायनाडमधूनही हरणार आहेत. ही लोकं सर्वत्र फिरून सर्वांना सांगत आहेत की घाबरू नका. आज मला त्यांना सांगायचे आहे की, ‘डरो मत, भागो मत’. पश्चिम बंगालमधील वर्धमान येथील सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, पराभवाच्या भीतीने मतदान संपताच ते दुसरी जागा शोधू लागतील. आधी ते अमेठीतून पळून गेले आणि आता रायबरेली मध्ये मार्ग शोधत आहे. राहुल केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत, जिथे दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले आहे.

Exit mobile version