काँग्रेस नेत्याने केली ठाकरे सरकारची पोलखोल

काँग्रेस नेत्याने केली ठाकरे सरकारची पोलखोल

महाराष्ट्रातील रिक्षाचालकांना राज्य सरकारने जाहीर केलेली मदत मिळावी यासाठी एका ऑनलाइन प्रणालीची सुरुवात ठाकरे सरकारकडून करण्यात आली आहे. पण ३६ तास उलटून गेले तरी सरकारी संकेतस्थळाची ही लिंक कामच करत नाही असे लक्षात आले आहे. ठाकरे सरकारच्या या ढिसाळ कारभाराची पोलखोल आघाडी सरकारमधील एक असलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यानीच केली आहे.

देशात कोविडचा तांडव सुरू आहे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्याची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारने गेल्या महिन्यात राज्यात लॉकडाऊन लावला आहे. त्यावेळी ठाकरे सरकारकडून जनतेला मदत करणाऱ्या काही घोषणा करण्यात आल्या होत्या. त्यातलीच एक घोषणा म्हणजे रिक्षाचालकांना आर्थिक मदत देणे. राज्यातील अंदाजे सात लाखापेक्षा अधिक रिक्षाचालकांना रुपये पंधराशे प्रमाणे मदत ठाकरे सरकार देणार असल्याचे जाहीर केले गेले. त्यासाठी १०७ कोटी रुपयांची तरतूदही सरकारकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पण हे पैसे रिक्षाचालकांना मिळत नसल्याचा आरोप होत आहे.

हे ही वाचा:

‘ठाकरे सरकारचा पॅकेज देण्यावर विश्वास नाही, घेण्यावर आहे’

अनिल परबांनी शेतजमिनीवर बांधले अनधिकृत रिसॉर्ट

चला कोकणाला देऊ मदतीचा हात; मुंबई भाजपाने दिली हाक

एफकॉन्स कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

ही मदत रिक्षाचालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्याच्या परिवहन खात्याकडून ऑनलाइन प्रणालीची सुरुवात करण्यात आली. पण ही साईटच योग्य प्रतिसाद देत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. निरुपम यांनी साईट चालत नसल्याचा एक व्हिडीओ आपल्या अपलोड केला आहे. छत्तीस तास उलटून गेले तरीही ही वेबसाईट चालत नसल्याचे निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. निरुपम यांनी केलेल्या टीकेमुळे ठाकरे सरकारला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा सुरु आहे.

Exit mobile version