संजय निरुपम यांनी केलं स्पष्ट; आधी राजीनामा नंतर हकालपट्टी

राजीनाम पत्र पोस्ट करत दिली माहिती

संजय निरुपम यांनी केलं स्पष्ट; आधी राजीनामा नंतर हकालपट्टी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटप झाल्यानंतर अनेक पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. अशातच मुंबईतील जागा वाटपावरून काँग्रेसचे नेते असलेले संजय निरुपम यांनीही ठाकरे गटावर निशाणा साधत काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. पक्षाविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे आणि भूमिकेमुळे काँग्रेसने सहा वर्षांसाठी त्यांची हकालपट्टी केल्याचे समोर आले होते. मात्र, याबाबत संजय निरुपम यांनी भूमिका मांडत स्पष्टीकरण दिले आहे. हकालपट्टी केलेले संजय निरुपम यांनी गुरुवार, ४ एप्रिल रोजी सांगितले की, त्यांचे राजीनाम्याचे पत्र मिळाल्यानंतर काँग्रेसने त्यांची हकालपट्टी केली आहे.

संजय निरुपम यांनी काँग्रेसच्या कारवाईबद्दल बोलताना म्हटले आहे की, आधी त्यांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला आणि त्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना दिलेल्या राजीनामा पत्राचा स्क्रीनशॉट शेअर करत निरुपम यांनी एक्सवर लिहिले आहे की, “काल रात्री पक्षाला माझे राजीनामा पत्र मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी माझी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. एवढी तत्परता पाहून आनंद झाला. ही माहिती शेअर करत आहे.”

हे ही वाचा:

“आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला भक्कम बनविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात पाया रचला”

छत्तीसगडमध्ये ८ तास चाललेल्या चकमकीत १३ माओवादी ठार!

विजेंदर सिंगचा काँग्रेसला ठोसा!

राघव चढ्ढा कुठे आहे?

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबईतील लोकसभेच्या सहा पैकी चार जागांवर उमेदवार जाहीर केल्यानंतर उत्तर मुंबईचे माजी खासदार निरुपम यांनी काँग्रेसच्या राज्य नेतृत्वावर जोरदार निशाणा साधला होता, ज्यात मुंबई उत्तर पश्चिम जागेवर त्यांचा लक्ष आहे. ते म्हणाले होते की काँग्रेस नेतृत्वाने स्वतःला ठाकरे गटासमोर झुकवू नये. मुंबईत एकतर्फी उमेदवार उभे करण्याचा ठाकरे गटाचा निर्णय स्वीकारणे म्हणजे काँग्रेसचा नाश करण्यासारखे आहे, असे संजय निरुपम म्हणाले होते. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसने निरुपम यांची हकालपट्टी करण्याचा ठराव मंजूर करून तो दिल्लीतील पक्षाच्या उच्चाधिकाऱ्यांकडे पाठवला. पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही त्यांचे नाव वगळण्यात आले आहे.

Exit mobile version