उदय सामंत हल्ल्याप्रकरणी शहर प्रमुख संजय मोरेंसह पाच जणांना अटक

उदय सामंत हल्ल्याप्रकरणी शहर प्रमुख संजय मोरेंसह पाच जणांना अटक

एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवार, २ ऑगस्ट रोजी पुण्यात हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली होती. या हल्ल्यप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याप्रकरणात पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी संजय मोरे यांना मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. तर या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा हल्ला शिवसैनिंकाकडून करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत उदय सामंत हे दगडुशेठच्या दिशेने जात होते. त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. कात्रज भागात काल आदित्य ठाकरे यांची सभा होती. या सभेसाठी शिवसैनिक जमले होते.

हे ही वाचा:

राष्ट्रकुल स्पर्धेत आणखी दोन सुवर्णपदकांवर भारताची मोहोर

१००, २००च्या बनावट नोटा छापणाऱ्या चारजणांच्या गठड्या वळल्या!

पोलीस भरतीतला तरुण ‘डमी’ चित्रीकरणामुळे सापडला….

८००० वर्षांपूर्वीची संस्कृती; सौदी अरेबियाच्या वाळवंटात सापडले प्राचीन मंदिर

हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप उदय सामनात यांनी केला आहे. या हल्ल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील दखल घेतली आहे. दगड मारून पळून जाणं ही मर्दुमकी नाही. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

Exit mobile version