नाहीतर रस्त्यावर पवार… पवार ओरडत,  दगड भिरकावत फिरायची पाळी येईल

'मनसे' पत्रातून संदीप देशपांडे यांचा संजय राऊतांना जोरदार टोला

नाहीतर रस्त्यावर पवार… पवार ओरडत,  दगड भिरकावत फिरायची पाळी येईल

खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  ठाण्यातील गुंड राजा ठाकूरला मला मारण्याची सुपारी दिली आहे आणि त्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचे आरोप राऊतांनी केले आहेत. आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणत केंद्रीय गृह मंत्री अमित शाह , मुंबई पोलीस आयुक्त आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पात्र लिहिले आहे. त्यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी राऊतांना चांगलेच फटकारले आहे.

 

त्यामुळे आता या पात्राची राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे. सगळ्या समाज माध्यमांवर हे पत्र व्हायरल झाले आहे. या पत्रांत देशपांडे यांनी राऊत  यांना आपण जी रोज सकाळी पत्रकार परिषद घेता, त्याऐवजी ती पत्रकार परिषद दोन दिवसातून एकदाच घेत जा. त्यानंतर हळूहळू ती एका आठवड्यातून एकदाच घेत जा असे करता येईल का? ते जरूर बघा आणि जर का ते शक्य नसेल तर पत्रकार परिषदेच्या आधी १० ते १५ मिनटे आधी योग करत जा. त्यामुळे तुम्हाला थोडे बरे वाटेल. असा टोला सुद्धा संदीप देशपांडे यांनी त्यांना लगावला आहे.

काय आहे पत्रात
देशपांडे यांनी राऊतांना तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटी हे पत्र लिहीत असल्याचे म्हंटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा  स्तर   खालावला असून त्यामुळे आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण जे आरोप करता ते बिनबुडाचे आरोप करत आहात. माणसाच्या मनाविरुद्ध घटना घडल्या कि, त्याचा संयम ढळू लागतो. त्या माणसाची चिडचिड होऊ लागते , कधी कधी तर नैराश्याचे झटके येऊ लागतात. तुम्ही कितीही नाकारले तरी हि सगळी लक्षणे आता तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी असा प्रेमळ सल्लाही त्यांनी राऊतांना दिला आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे आपणच सगळ्यांना पवारसाहेबांच्या  नादी लावले आहे. आणि त्यामुळे शिवसेना हातातून निसटली आहे. हीच सल तुम्ही मनाला लावून घेतली आहे. ती सल आपण मनातून काढून टाका. तुम्ही एकटेच या ह्रासाला जबाबदार नसून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. हे मुख्य लक्षात घ्या नाहीतर तुम्ही काही दिवसांनी रस्त्यावर पवार…… पवार असे ओरडत,  दगड भिरकावत फिरायची पाळी  तुमच्यावर येईल असेही पुढे त्यांनी पत्रात म्हंटले आहे. पुढे देशपांडे म्हणतात, कधी काळी  तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्तिगत संवाद होता, ममत्व होते आणि त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच ! पटले तर घ्या

 

Exit mobile version