संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केल्यानंतर संजय राऊतांनी भाजपा नेते किरीट सोमैय्या यांच्यावर ‘आयएनएस विक्रांत’ या नौदलाच्या युद्धनौकेच्या संदर्भात घोटाळा केल्याचे आरोप केले. तर त्यावरूनच आता किरीट सोमैय्या यांनी आक्रमक होत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. विक्रांत घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या संजय राऊतांनीच या प्रकरणाचे पुरावे द्यावेत असा पलटवार सोमैय्या यांनी केला आहे.
किरीट सोमैय्या आज जरंडेश्वर साखर कारखान्याच्या आरोपां संदर्भात ईडी कार्यलयात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्यावर झालेल्या आरोपांच्या संदर्भात भाष्य केले. संजय राऊत यांनी किरीट सोमैय्यांवर आयएनएस विउक्रांतच्या नावे ५८ कोटी रुपाये जमा करून हडपल्याचा आरोप केला आहे. त्या अनुषंगाने बोलताना सोमैय्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
हे ही वाचा:
धक्कादायक! राज्यमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये मुलं पुस्तकात बघून लिहितायत उत्तरं
लेक्चरदरम्यान हिंदू देवतांचा अपमान करणारा प्रोफेसर निलंबित
सोमय्या पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल
संजय राऊत यांनी या प्रकरणात एक तरी कागद द्यावा असे आव्हान सोमैय्यांनी दिले आहे. त्यांच्यासमोर जी काही माहिती आहे ती त्यांनी देशाच्या जनतेसमोर ठेवावी. या संदर्भात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे, पण त्याची कॉपी देण्यास पोलीस तयार नाहीत. या संदर्भात कागदोपत्री त्यांच्याकडे कोणताच पुरावा नसल्याचे सोमैय्या यांनी म्हटले आहे. तर पोलिसांच्या चौकशीसाठी आपण तयार असून पोलिसांच्या चौकशीचे स्वागत आहे असे त्यांनी म्हटले आहे
तर पुन्हा एकदा सोमैय्या हे जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रकरणात सक्रिय होताना दिसत आहेत. यामुळे राज्याचे उपमुख्यमनातरी अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.