तापसी, अनुरागच्या फाटक्यात किसान मोर्चाचा पाय

तापसी, अनुरागच्या फाटक्यात किसान मोर्चाचा पाय

अनुराग कश्यप, तापसी पन्नू यांच्या घर,कार्यालयांवर तीन मार्च रोजी आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले. आयकर विभागाच्या या कारवाईत नेमके काय हाती आले याचे नेमके तपशील अजून समोर आले नसले तरीही या विषयात आता नवीन ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात आता संयुक्त किसान मोर्चाने उडी घेतली आहे. तापसी आणि अनुराग काश्यपवरच्या छापेमारीवरून किसान मोर्चाने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

बुधवारी आयकर विभागातर्फे मुंबई, पुणे येथील एकूण बावीस ठिकाणांवर छापे मारल्याची माहिती आहे. ‘फँटम फिल्म्स’ या चित्रपट निर्मितीच्या कंपनीशी संलग्न असलेल्या कलाकारांच्या घरी आणि कार्यालयांवर छापे मारत आयकर विभागातर्फे तपास करण्यात आला आहे. पण संयुक्त किसान मोर्चातर्फे या धडक कारवाईचा निषेध करण्यात आला आहे. “शेतकरी आणि त्यांच्या समर्थकांना त्रास देण्याच्या आणि त्यांच्यावर हल्ले करण्याच्या नवनवीन पद्धती केंद्र सरकार तर्फे शोधल्या जात आहेत.” अशी टीका संयुक्त किसान मोर्चातर्फे करण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय आहे?
आयकर विभागाला अशी माहिती मिळाली होती की चित्रपट जगतातील काही दिग्गजांकडून करचोरी केली जात आहे. चित्रपटांतून मिळणाऱ्या उत्पन्नांवर जो कर भरणे अपेक्षित असते तो भरला गेला नाहीये. या संशयावरूनच आयकर विभागाकडून कारवाई करत तपास केला जात आहे. त्यासाठी अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बेहेल अशा अनेकांच्या घर, कार्यालयांवर आयकर विभागाने छापे मारले आहेत.

Exit mobile version