मुंबईतील क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर एनसीबी मुंबईचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे हे चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडेंवर अनेक आरोप करण्यात आले असतानाच आता समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
समीर वानखेडे यांच्या नावावर असलेल्या नवी मुंबईतील बारचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांच्या बारचे लायसन्स रद्द केले आहेत. वादग्रस्त आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या मालकीचा वाशीतील सदगुरू बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. खोटी माहिती देऊन लायसन्स घेतल्याचे स्पष्ट झाल्याने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
समीर वानखेडे हे अल्पवयीन असताना त्यांना बारचा परवाना देण्यात आला होता असा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. बारचा परवाना मिळवण्यासाठी किमान वय २१ वर्षे आवश्यक आहे या संबंधित बारचा परवाना झाला त्यावेळी त्यांचे वय अवघे १७ वर्षे होते. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाने समीर वनाखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर आता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा बार परवाना रद्द केला आहे.
हे ही वाचा:
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांच्या पुनर्रचनेत शिवसेनेचा डाव
निलंबन रद्द झालेल्या भाजपाच्या आमदारांनी ठेवले विधानसभेत पाऊल
Budget 2022 : गंगाकिनारी रसायनमुक्त शेतीला देणार चालना
नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यावर सिंधुदुर्ग न्यायालयाबाहेर राडा
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. तेव्हाच त्यांनी वानखेडे यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असताना त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावाने दारुच्या दुकानाचा परवाना दिल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता.