मुंबईत ड्रग्ज माफियांवर कारवाई करून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात मोर्चा काढणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना सोशल मीडियापासून विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे. समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटना मैदानात उतरली आहे. समीर वानखेडे यांचा बुधवारी एनसीबीच्या मुंबई कार्यालयाबाहेर सत्कार करण्यात आला. त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली.
समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक रोजच आरोप करत आहेत. परंतु आता समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ आता अनेक संघटनाही समोर येत आहेत. बुधवारी सकाळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. समीर वानखेडे यांनी कार्यालयात प्रवेश करताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि यावेळी त्यांना छत्रपती शिवरायांची प्रतिमा अर्पण करण्यात आली. समीर वानखेडे यांनी मात्र या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यानंतर या संघटनेचे अध्यक्ष नितीन चौघुले म्हणाले की, नवाब मलिक केवळ कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदनामी करत आहेत. ड्रग माफियांचे समर्थन करणाऱ्या मलिक यांना मंत्री होण्याचा नैतिक अधिकार नाही. भविष्यातही मलिक यांच्याविरोधात आंदोलन करणार असल्याचे चौघुले यांनी सांगितले.
हे ही वाचा:
घरोघरी जाऊन लसीकरण करा, मोदींचे राज्यांना आदेश
गुडगावमध्ये हिंदूंच्या संघर्षाला अखेर यश
काय आहे ‘वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड’?
अजित पवार लोकांना मूर्ख बनवणं बंद करा
समीर वानखेडे यांनी यापूर्वीच नवाब मलिक यांच्याकडून होत असलेल्या छळामुळे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीला अनुसरून आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
त्या अनुषंगाने या आयोगाने गृहमंत्रालयाचे सचिव, मुख्य सचिव महाराष्ट्र सरकार, पोलिस महासंचालक महाराष्ट्र सरकार आणि पोलिस आयुक्त मुंबई यांना पत्र पाठवून कृती अहवाल पाठविण्याची विनंती केली आहे. येत्या ७ दिवसांत यासंदर्भात हा अहवाल सादर करायचा आहे.