अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाकडून समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना दणका मिळाला आहे. समीर वानखेडे यांची जात अनुसूचित जातीच्या वर्गात मोडते असे अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. समीर वानखेडेंना लक्ष्य करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या असून चौकशीच्या नावाखाली समीर वानखेडेंना त्रास न देण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहेत.
उपलब्ध कागदपत्रांनुसार समीर वानखेडेंची जात ही अनुसूचित जातीच्या वर्गात मोडते असे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच समीर वानखेडेंच्या जातीवर सवाल उपस्थित करत त्यांना लक्ष्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने दिले आहेत. तसेच चौकशीच्या नावाखाली समीर वानखेडेंचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा छळ करु नये अशा सूचना देखील पोलिसांना करण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्रात जात पडताळणी समितीने एक महिन्यात अहवाल सादर करण्यास आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे आता नवाब मलिकांवर गुन्हा दाखल होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हे ही वाचा:
मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा?
किरीट सोमय्यांचा भाजपकडून पुण्यातल्या त्याच पायऱ्यांवर सत्कार
डॉक्टर घेणार हिप्पोक्रॅटिक ओथ ऐवजी चरक शपथ?
‘काँग्रेसची हुजुरी करण्यासाठी संजय राऊत वाटेल ते बोलू शकतात’
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर एनीसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले होते. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात कोणतंही वादग्रस्त वक्तव्य करणार नाही, अशी हमी देऊनही नवाब मलिक शांत बसले नव्हते. तेव्हा समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी त्यांच्या कुटुंबियांची बदनामी सुरूच असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाचा अवमान करून नवाब मलिक हे वानखेडे यांच्यावर आरोप करतच होते. मात्र, आता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने नवाब मलिक यांना मोठा धक्का दिला आहे.