सोनिया गांधी, राहुल गांधी पंतप्रधान होण्यासाठी पात्र आहेत का?

सोनिया गांधी, राहुल गांधी पंतप्रधान होण्यासाठी पात्र आहेत का?

अजेंडा ‘आज तक’च्या मंचावरून भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज काँग्रेसवर निशाणा साधला. त्यावेळी शिक्षणाविषयी त्यांना सवाल केला असता त्यांनी सोनिया गांधी यांचे शिक्षण काय, त्या प्रधानमंत्री बनण्यासाठी पात्र आहेत का, राहुल गांधी पंतप्रधान होण्यासाठी पात्र आहेत का असा सवाल त्यांनी विचारला आहे. मी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालो तेव्हा बीजेपीचे सरकार नव्हते, युपीएचे सरकार होते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

संबित पात्राशीच तुम्ही लढत राहिलात तर पंतप्रधान कधी बनणार असा टोला संबित पात्रा यांनी कन्हैया कुमार आणि राहुल गांधी यांना लगावला आहे. मोदींनी कधीही जनतेचा पैसा खिशात टाकला नाही. हिंदू- मुस्लीम असे काही वाद निर्माण करायचे नाहीत. सर्व मुस्लीम लोकही या देशाचे नागरिक आहेत, असे संबित पात्रा म्हणाले. ३७० कलम कोणीही हटवू शकत नाही असे बोलले जायचे पण आज ३७० कलम हटवला आहे. कलम हटवण्याची हिंमत मोदींनी आणि अमित शहा यांनी दाखवली.

हे ही वाचा:

वरळी सिलेंडर स्फोट प्रकरण; भाजपाकडून स्थायी समिती सभा तहकुबी

अंतराळातही आता झणझणीत, तिखट खाता येणार! वाचा का ते…

अंजू बॉबी जॉर्जची आणखी एक ऐतिहासिक उडी

नागा संस्कृतीच्या हॉर्नबिल उत्सवाला लोकांनी घेतले डोक्यावर

काँग्रेसला जेव्हा विचारले जाते की मोदींना पर्याय कोण? तेव्हा ते सांगतात, की १३५ कोटी जनता आणि याचा अर्थ त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही, असे संबित पात्रा म्हणाले. राहुल गांधींना पर्याय कन्हैया कुमार जरुर आहे. हिंमत असेल तर म्हणावे की मोदींना पर्याय राहुल गांधी आहेत. त्यांच्या तोंडातून मोदींना पर्याय राहुल गांधी आहेत, हे सुद्धा बोलले जात नाही आणि निघाले निवडणूक जिंकायला, असा टोला संबित पात्रा यांनी काँग्रेसला लगावला आहे. काँग्रेसजवळ मोदींसाठी कोणताही पर्याय नाही. ममता बॅनर्जींपासून आखिलेश यादवपर्यंत कोणही राहुल यांना पर्याय मानत नाहीत. काँग्रेसच्या आतील जी- २३ हा गटही त्यांना पर्याय मानत नाही, असे ते म्हणाले.

Exit mobile version