पंतप्रधान मोदींचा जिमचा व्हीडिओ व्हायरल

पंतप्रधान मोदींचा जिमचा व्हीडिओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या उत्तर प्रदेशमध्ये असून तेथे ते वेगवेगळ्या प्रकल्पांची पायाभरणी करत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी एका जीममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी मोदींचा हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

नरेंद्र मोदींचा हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील मेरठमधील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेरठमध्ये मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी करण्यात आली. त्याआधी नरेंद्र मोदी या विद्यापीठाच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले. तिथे जीममध्ये जाऊन मोदींनी संपूर्ण जीमचा आढावा घेतला. तेव्हा जीममध्ये काही ट्रेनरही होते. त्यांच्याशी मोदींनी गप्पा मारल्या. यानंतर मोदींनी बॉडी वेट लॅटपुल मशीनवर बसत व्यायाम केला.

हे ही वाचा:

अंतिम दिवशी ई-फायलिंग पोर्टलवर करोडो रुपयांचा परतावा

…म्हणून गुंड सुरेश पुजारीला हवा होता फिलिपिन्समध्ये आश्रय

सांगली जिल्हा बँकेच्या डायरीतून पडळकरांचे नाव वगळले

जावई समीर खान अडचणीत येताच नवाब मलिक यांची एनसीबी विरोधात पुन्हा बोंबाबोंब

नरेंद्र मोदी हे अनेकदा जनतेशी संवाद साधताना निरोगी स्वास्थ्याविषयी बोलत असतात. २०१९मध्ये मोदींनी फिट इंडिया मिशनची सुरुवात केली होती. मोदींचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून संबित पात्रा यांनी मोदींच्या व्हिडीओसोबत लिहिले आहे की, आपल्या सशक्त, समृद्ध आणि निरोगी भारताचा यशस्वी पाया पंतप्रधान नरेंद्र मोदी, असे म्हटले आहे.

Exit mobile version