30 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरराजकारण'योगी त्यांच्या मठात जातील आणि मोदी डोंगरावर जातील तेव्हा तुम्हाला कोण वाचवेल'...

‘योगी त्यांच्या मठात जातील आणि मोदी डोंगरावर जातील तेव्हा तुम्हाला कोण वाचवेल’ ओवेसी बरळले

Google News Follow

Related

ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ओवेसी हे उत्तर प्रदेशमधील पोलिसांना धमकीच्या स्वरात इशारा देताना दिसत आहेत.

ओवेसी यांनी १२ डिसेंबर रोजी कानपूरमध्ये बोलताना म्हटले होते की, ‘मला त्या पोलिसांना सांगायचे आहे की, योगी नेहमीच मुख्यमंत्री नसतील आणि मोदी नेहमीच पंतप्रधान असतील असे नाही. आम्ही मुस्लिम अनादी काळापासून मौन बाळगतो, पण लक्षात ठेवा आम्ही तुमचे अत्याचार विसरणार नाही. तुमचा अत्याचार आम्ही लक्षात ठेवू. अल्लाह… त्याच्या सामर्थ्याने तुमचा शेवटचा नाश करेल आणि गोष्टी बदलतील. तुम्हाला वाचवायला कोण येणार? योगी त्यांच्या मठात जातील आणि तेव्हा मोदी डोंगरावर जातील.’

ओवेसींच्या या वादग्रस्त विधानावर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. ‘तुम्ही कोणाला धमकावत आहात? या वीर भूमीवर जेव्हा जेव्हा औरंगजेब आणि बाबर येतील तेव्हा तेव्हा या मातृभूमीच्या कोणत्या ना कोणत्या भागातून छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि योगी- मोदी हे उभे राहतील,’ असे संबित पात्रा म्हणाले.

भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, ‘छोटे ओवेसी पोलिसांना १५ मिनिटे काढून टाकण्यास सांगतात आणि हिंदूंना धमकावत आहे. मोठे ओवेसी यांनी पोलिसांना उघडपणे धमकी दिली आहे. हरिद्वारवर बोलणारे सेक्युलॅरिझमचे सगळे सूर या मानसिकतेवर गप्प आहेत कारण, हिंदूंना धमकावणे धर्मनिरपेक्ष आहे आणि जय श्री रामचे नाव घेणे जातीयवादी आहे.’

हे ही वाचा:

हरभजन सिंगचे क्रिकेटला अलविदा

तुकाराम सुपेंच्या घरातील घबाड संपेना; ३३ लाख जप्त

‘समाजवादी अत्तर’ बनवणाऱ्या उद्योजकांवर आयकर विभागाची धाड! सापडले १५० कोटी रुपये

अतुल राणे यांची ब्रम्होस एअरोस्पेस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा