30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरराजकारणसंभाजीराजे छत्रपतींनी मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करू नये

संभाजीराजे छत्रपतींनी मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करू नये

Google News Follow

Related

संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करत असतील तर ती गोष्ट ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. मात्र, यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. संभाजीराजे यांनी चालढकल केली तर भाजप जो कोणी मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी पुढाकार घेईल, त्याच्या पाठिशी उभा राहील, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

ते शुक्रवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांना संभाजीराजे राज्य सरकारला वेळ देत आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, मराठा मोर्चा काढण्यात चालढकल झाली तर ती बाब ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. त्यानंतर मराठा आंदोलनाचं नेतृत्व दुसऱ्या कोणाकडे जाईल किंवा काय होईल, ते माहिती नाही. मात्र, वेळ निघून गेल्यास मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल. संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेमुळे सरकारला आरक्षणाच्या प्रश्नापासून पळवाट काढण्याची संधी तर मिळणार नाही ना, याचा विचार संभाजीराजे यांनी केला पाहिजे.

संभाजीराजे एकदा मोर्चा काढणार, एकदा लाँग मार्च काढणार असे सांगतात. कोल्हापुरातही १६ जूनला मराठा मोर्चा निघणार का, याची अद्याप शाश्वती नाही. तुम्ही या सर्व गोष्टी मराठा समाजासमोर नीटपणे मांडल्या पाहिजेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

संभाजीराजे यांनी रायगडावरुन मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला मी त्यांना पाठिंबा जाहीर केला. आता त्यांनी माघार घेतली तरी भाजपच्या भूमिकेत फरक पडणार नाही. पण उद्या कोल्हापुरात दुसऱ्या कोणी पुढाकार घेऊन मोर्चा काढला तर भाजप त्यांनाही पाठिंबा देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा :

पुण्यात सोमवारपासून अनलॉक, हे असतील नवे नियम…

केवळ मनाच्या दहा पालख्यांना वारीची परवानगी

पायी वारीसाठी बायोबबल नियमांनुसार, परवानगी द्या

कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

महाविकासआघाडी सरकार धार्मिक गोष्टींना विरोध करते बाकी सगळ्याला परवानगी देते. शरद पवार यांनाही आजारपणाच्या काळात हॉटेल मालकांची काळजी होती. मात्र, आषाढीच्या पायी वारीसाठी वारकऱ्यांना परवानगी मिळालीच पाहिजे, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा