27 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरराजकारणसंत तुकारामांच्या अभंगातून संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला

संत तुकारामांच्या अभंगातून संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला

Google News Follow

Related

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राज्यसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होता. अखेर या निवडणुकीचा निकाल समोर आला असून भाजपाचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत तर महाविकास आघाडी सरकारचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी सहाव्या जागेवर विजय मिळवत शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी संत तुकाराम महाराजांचा अभंग ट्विट केला आहे. “वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा। परि नाहीं दशा साच अंगीं।। तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा। फजित तो खोटा शीघ्र होय।।” हा अभंग संभाजीराजेंनी ट्विट केला आहे. या अभंगाचा अर्थ होतो की, ‘वाघाचे पांघरुन घेतल्यावर वाघासारखे दिसता येते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. पण, असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते.’ हा अभंग ट्वीट करत संभाजीराजे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

४२ मतांच्या संख्याबळाचा खोटा आव आणणाऱ्या शिवसेनेची आणि संजय राऊत यांची चांगलीच फजिती झाली, हेच संभाजीराजे यांना सुचवायचे असल्याचे चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता. मात्र, शिवसेना आणि संजय राऊत यांनी तटस्त भूमिका घेत त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारुन पक्षाचा उमेदवार उभा केला.

हे ही वाचा:

मध्य प्रदेशमध्ये १८ जणांनी स्वीकारला हिंदू धर्म

सोनिया गांधींना ईडीचे पुन्हा समन्स

हनुमान ‘चाळीसा’ भाजपाला फळली; धनंजय महाडिक विजयी

‘निवडणूक लढवण्यासाठी नाही जिंकण्यासाठी लढवली’

तसेच आमच्याकडे ४२ मते असून आम्ही अपक्ष उमेदवाराला का देऊ? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित करत पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट संभाजीराजे यांना घातली होती. मात्र, राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर ४२ मतांच्या आकड्याचा फुगा फुटला आहे. ही मते सेनेकडे मुळात नव्हतीच, त्या मतांसाठी शिवसेना संभाजीराजे छत्रपती यांच्यावर अटी लादत होती, हे स्पष्ट झाल्याच्या चर्चा आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा