शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादग्रस्त व्यक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. संभाजी भिडे यांनी कपाळावर टिकली किंवा कुंकू न लावलेल्या महिला पत्रकाराला प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. त्यांच्या या नकार देण्यामागील भूमिकेचा खुलासा करण्यासाठी महाराष्ट्र महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी संभाजी भिडे बुधवारी मंत्रालयात पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी मंत्रालयात कोणाची भेट घेतली यासंदर्भात ‘साम’ वाहिनीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे त्यांची प्रतिक्रिया घेण्यास गेल्या. संभाजी भिडे यांनी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलेल, असं थेट त्या महिलेला म्हटलं. आमची अशी भावना आहे की, प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही आहे. तू कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो, असं म्हणून संभाजी भिडे तेथून निघून गेले.
संभाजी भिडे यांच्या या व्यक्त्यव्याची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. संभाजी भिडे यांना महिला आयोगाने याबाबत खुलासा करण्यासाठी नोटीस बजावली आहे. स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तृत्वाने सिध्द होतो. त्यामुळे आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहचविणारे असल्याचे महिला आयोगाने नोटीसमध्ये म्हटले आहे. संभाजी भिडे यांच्या वक्त्यव्यातून समाजातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे महिला आयोगाने संभाजी भिडे यांना त्यांची भूमिका त्वरित स्पष्ट करण्यास सांगितली आहे.
हे ही वाचा:
मुंबईत एका मुलीचे फुटपाथवरून अपहरण, दोन महिला अटकेत
राज्यातील बँकिंग घोटाळ्यांची होणार चौकशी
भारताने बांगलादेशला नमवले आणि पाकिस्तानची केली कोंडी
नाशिकमध्ये देशातील पहिली खासगी बाजार समिती
दरम्यान, संभाजी भिडे याआधीही अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. एकदा त्यांनी दावा केला होता की, माझ्या बागेतील आंबे खाल्ल्याने जोडप्याला मुलगा होतो. यावेळीसुद्धा ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.