उद्धव ठाकरे यांच्या गटाचं चिन्ह जाणार?

उद्धव ठाकरे यांच्या गटाचं चिन्ह जाणार?

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात उद्धव ठाकरे यांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. कारण निवडणूक आयोगाने दिलेलं मशाल चिन्ह त्यांच्याकडून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मशाल चिन्ह हे बिहारमधील समता पार्टीचं आहे. त्यामुळे समता पार्टीने मशाल चिन्हाला विरोध केला असून शनिवार, १४ ऑक्टोबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल हे दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.

यासंदर्भात उदय मंडल म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जे मशाल निशाण दिले आहे त्यावर माझा आक्षेप आहे. यासाठी आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करणार आहोत. कारण मशाल चिन्ह ही अजूनही समता पार्टीची ओळख आहे. हे चिन्ह समता पार्टीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना आमचं चिन्ह कसं काय दिलं याचं मला आश्चर्य वाटतं आहे.

हे ही वाचा:

मोटारीतून प्रवास करणाऱ्यासाठी सिलबेल्ट सक्ती

राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदेंच्या पाठीशी

न्यायालयाच्या आदेशानंतर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर

राणा आयुबचे ईडीने १ कोटी ७७ लाख रुपये गोठवले

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला चिन्ह दिले असता समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. देवळेकर यांनी यापूर्वीसुद्धा ईमेलद्वारे मशाल या चिन्हावर हक्क सांगितला होता. देवळेकर यांच्या मते, अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीवेळी या चिन्हामुळे मतदारांचा गोंधळ उडू शकतो. या दोन चिन्हांमुळे मतविभागणी होऊ शकते. त्यामुळे मशाल चिन्ह इतर पक्षाला देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

Exit mobile version