27 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरराजकारणचक्क 'सामना' म्हणतोय, देवाभाऊ अभिनंदन!

चक्क ‘सामना’ म्हणतोय, देवाभाऊ अभिनंदन!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्याचे कौतुक

Google News Follow

Related

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील भाजपा यांनी २०१९ मध्ये वेगवेगळे मार्ग स्वीकारल्यानंतर दोन्ही पक्षांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्येही टोकाची टीका केली जात होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपने मोठे यश मिळवले आणि यानंतर उद्धव ठाकरे यांची भूमिका काहीशी मवाळ दिसून आल्याच्या चर्चा आहेत. ‘एक तर मी राहीन, नाहीतर तू राहशील’ अशी भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यानंतर पुन्हा एकदा ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून मांडलेल्या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळाचे चर्चांना उधाण आले आहे. ‘सामना’तील अग्रलेखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त ११ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले तर अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटनही केले. यानंतर ‘सामना’च्या अग्रलेखातून ‘देवाभाऊ, अभिनंदन!’ या मथळ्याखाली फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळण्यात आली आहेत. ‘नक्षलवाद्यांचा जिल्हा’ याऐवजी गडचिरोलीला ‘पोलाद सिटी’ ही नवीन ओळख मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे, असे अग्रलेखात म्हटले आहे. गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा, यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत. ते चुकीचे नाही. फक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा विडा आपण तेथील सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठीच उचलला आहे, कोणा खाणसम्राटांसाठी नाही, हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंना घ्यावी लागेल. तरच नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, हा त्यांचा वादा खरा होईल. बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत, असे अग्रलेखात म्हटले आहे.

हे ही वाचा : 

मुंब्र्यात मराठी माणसाला माफी मागायला लावली! मनसेची मराठी माणसाला हाक

रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे मृत झालेला रुग्ण झाला जिवंत!

अमेरिका हल्ल्यातील संशयित आयएसआयएसशी संबंधित; अमेरिकेच्या लष्करातही केले होते काम

मदरशाच्या नावाखाली मुबारक अलीकडून खोट्या नोटा छापण्याचे काम!

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांमुळे विकासाची साधी तिरीपही येऊ शकली नाही, असा आक्षेप घेतला जातो. त्यात तथ्य आहेच, परंतु राज्यकर्त्यांची इच्छाशक्तीही अशा ठिकाणी अनेकदा महत्त्वाची ठरत असते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती दाखविण्याचे ठरविले असेल तर आनंदाची गोष्ट आहे, असे म्हणत फडणवीस सरकारचे कौतुक अग्रलेखातून करण्यात आले आहे. जहाल महिला नक्षलवादी ताराक्कासह ११ नक्षलवाद्यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत केलेले समर्पण आणि त्याच वेळी स्वातंत्र्यानंतर म्हणजे ७७ वर्षांनी प्रथमच धावलेली अहेरी ते गर्देवाडा ही एसटी बस या गोष्टी निश्चितच मुख्यमंत्र्यांच्या ‘मिशन गडचिरोली’च्या दृष्टीने बोलक्या आहेत, असंही अग्रलेखात म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा