आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचा प्रवक्ता मनीष जगन अगरवाल याला पोलिसांनी अटक केली आहे. भाजपाकडून त्याच्याविरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याने या प्रवक्त्यांविरोधात तसेच पत्रकारांविरोधात घाणेरड्या भाषेत ट्विट केली होती. शिवाय, त्यांच्या कुटुंबियांबद्दलही त्याने अत्यंत घाणेरडी भाषा वापरली होती.
लखनऊचे पोलिस आयुक्त एस. बी. श्रीआडकर यांनी सांगितले की, आमच्याकडे अगरवाल याच्याविरोधात अनेक तक्रारी आल्या. त्याने भाजपाचे अनेक प्रवक्ते आणि पत्रकारांविरोधात अश्लाघ्य भाषेचा वापर करणारी ट्विट केली होती. शिवाय, त्यांच्या कुटुंबियांबद्दलही त्याने आक्षेपार्ह भाषा वापरली होती. आम्ही त्याची चौकशी केली. त्यासंदर्भातील पुरावे गोळा केले. आम्ही मनीष जगन अगरवाल याला अटक केली आहे. जर अशा प्रकारचे कृत्य अन्य कुणाकडूनही झाले तर त्याच्याविरोधातही कठोर कारवाई केली जाईल.
हे ही वाचा:
संजय राऊत, तोंड सांभाळून बोला नाहीतर तोंड फुटेल!
भूकंपाच्या धक्क्याने हिंगोली हादरले
बॉलिवूड तारे -तारकांनाही पब्लिक हॉलिडे
आम्हाला आमची जमीन माहिती आहे, जे हवेत आहेत त्यांची तपासणी करायला हवी
सेंट्रल झोनच्या पोलिस उपायुक्त अपर्णा कौशिक यांनी सांगितले की, २६ डिसेंबर २०२२ला विश्वगौरव त्रिपाठी या पत्रकाराने अगरवाल विरोधात तक्रार केली होती. अगरवालने त्रिपाठी यांच्याविरोधात काही आक्षेपार्ह विधाने केली होती.
अगरवाल याला अटक केल्यानंतर समाजवादी पार्टीने त्याचा निषेध केला असून त्याला अटक करणे हे निंदनीय असल्याचे ट्विट केले आहे. अगरवाल याला त्वरित सोडून देण्यात यावे अशी मागणीही समाजवादी पार्टीने केली आहे.
या घटनेमुळे संतापून सपाचे अनेक कार्यकर्ते लखनऊ येथील पोलिस मुख्यालयाबाहेर जमले होते. पण पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले. राजकीय नेते जगन्नात प्रसाद अगरवाल यांचा तो पुत्र असून सितापूर येथील रहिवासी आहे.