लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी राजकीय खलबतेही वेगाने वाढत आहेत.एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षात जाण्याची कसरतही सुरू झाली आहे.या मालिकेत, यूपीमध्ये नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या आमदार पूजा पाल यांनी यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची भेट घेतली आहे.पूजा पाल यांच्या भेटीमुळे त्या लवकरच भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे.खासदार, आमदार, नेते आणि कार्यकर्ते फुटून दुसऱ्या पक्षात प्रवेश करू याची खबरदारी सर्व पक्षांकडून येत आहे.सध्या पाहिले तर देशात भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाची कामगिरी पाहता अनेक पक्षातील बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.दरम्यान, समाजवादी पक्षाच्या आमदार पूजा पाल या देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.आमदार पूजा पाल यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.पूजा पाल सध्या कौशांबी जिल्ह्यातील चैल मतदारसंघातून आमदार म्हणून कार्यरत आहेत. प्रयागराज शहरातील धुमनगंज भागात त्या राहतात.
हे ही वाचा :
एडनच्या आखातात येमेनच्या हौती बंडखोरांकडून क्षेपणास्त्रहल्ला; दोघांचा मृत्यू
‘राजकीयदृष्ट्या पक्षपाती निर्णय कधीच दिला नाही’
पोलिसभरती पेपरफुटी प्रकरणी सात जणांना अटक!
सपा प्रमुख अखिलेश यादव आज (७ मार्च) प्रयागराजला पोहोचले आहेत.अखिलेश यादव प्रयागराजमध्ये येण्याच्या काही तास आधी पूजा पाल यांनी उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांची भेट घेतली.त्यामुळे पूजा पाल या भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी पूजा पाल यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. २००७ आणि २०१२ मध्ये पूजा पाल बसपाच्या तिकिटावर प्रयागराज सिटी पश्चिम मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.