उत्तर प्रदेशातील एका रस्त्यावर अखिलेश यादव आपल्या समाजवादी पक्षाचा झेंडा घेऊन उभे असताना एक गाडी येते आणि मग त्यात बसून अखिलेश पुढे निघतात. त्यावर समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. अनुराग भदौरिया यांनी ट्विट केले की, ‘आता सत्तेत अखिलेश येणार याची ग्वाही देणारा हा व्हीडिओ आहे. पाहा. अखिलेश रस्त्यावर हात दाखवत उभे आहेत. आमची गाडी बंद पडल्यामुळे आम्ही लिफ्टच्या शोधात होतो. कुणी लिफ्ट देत नव्हता. पण त्यांनी डोक्यावर लाल टोपी घातली आणि हातात समाजवादी पक्षाचा झेंडा घेतल्यावर एक कार येऊन थांबली. बघा, समाजवादी पार्टीबद्दल लोकांच्या मनात किती प्रेम आहे ते. टोपी आणि झेंडा पाहून गाडीने अखिलेश यांना लिफ्ट दिली. ती सुद्धा एक्स्प्रेस वे वर. म्हणजे आता उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत अखिलेशच येणार.’
कल रात हमारी गाड़ी ख़राब हो गई थी।कोई लिफ़्ट नहीं दे रहा था।।जैसे ही लाल टोपी और झंडा लिया।समाजवादी पार्टी से जनता का प्रेम देखिए, समाजवादी टोपी का झंडा देखा और तुरंत लिफ्ट दे दी,वो भी एक्सप्रेस वे पर। ये भरोसा हैकि अखिलेश आ रहे हैं #अखिलेश_आ_रहे_है @yadavakhilesh @samajwadiparty pic.twitter.com/TJrvTTp1pt
— Dr Anurag bhadouria (@anuragspparty) September 25, 2021
त्यावर नेटकरी चांगलेच तुटून पडले. एकाने जाब विचारला की, अखिलेश गाडीतून तर पुढे गेले पण तो व्हीडिओ काढणाऱ्याला विसरले.
एकाने मात्र म्हटले की, हे सगळे सीसीटीव्हीतून दिसते आहे त्यामुळे खरे आहे. त्यावर प्रतिक्रिया आली की, सीसीटीव्ही कुठे असा फिरतो. हा तर कॅमेऱ्याने काढलेला व्हीडिओ आहे.
हे ही वाचा:
ठाण्यात अभियंत्यांना निलंबित करून प्रकरण ‘बुजवले’
मुंबईचे माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचे निधन
अंबरनाथमध्ये बांधा-खोदा-बांधा-पुन्हा खोदा धोरणावर कोट्यवधी खर्च
बापरे! श्वानाच्या श्वसननलिकेत अडकली होती गोटी…
एका नेटकऱ्याने तर जरा अधिकच वेगाने प्रतिक्रिया दिली आणि अखिलेश यांना लिफ्ट देणाऱ्या इनोव्हा गाडीच्या इन्शुरन्सची माहिती काढली. ती माहिती ट्विट केली. त्यानुसार या गाडीचा इन्शुरन्स फेब्रुवारीतच संपलेला आहे. त्या नेटकऱ्याने मागणी केली की, या गाडीवर तात्काळ कारवाई करून दंड लावा.
अखिलेश यादव हे सध्या उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत येण्याची स्वप्ने पाहात आहेत. त्यासाठी मतदारांना ते म्हणत आहेत ‘थोडा लिफ्ट करा दे’.