पित्रोडा म्हणतात, भारताविरोधात परदेशात का बोलायचे नाही? समस्या काय आहे?

मुलाखतीत राहुल गांधी यांची घेतली बाजू

पित्रोडा म्हणतात, भारताविरोधात परदेशात का बोलायचे नाही? समस्या काय आहे?

राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या भाषणात देशाची बदनामी केल्याचा आरोप होत असताना आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी पुढे येत असताना राहुल गांधी यांचे समर्थक सॅम पित्रोडा यांना मात्र राहुल गांधी यांचे समर्थन करताना देशाबद्दल काही बोलले तर झाले काय, असा सवाल उपस्थित केला.

पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीत पित्रोडा यांना सवाल उपस्थित करण्यात आला की, राहुल गांधी यांनी भारताची प्रतिमा या भाषणातून खराब केली, त्यावर पित्रोडा म्हणाले की, नेमकी समस्या काय आहे? तुमच्या देशाविरोधात तुम्ही परदेशात काहीही बोलू शकत नाही, असे काही आहे का? अशी संकल्पना कुणाची आहे? जग सगळ्यांचेच आहे.  त्यामुळे तुम्ही परदेशात जाऊन काही बोलायचे नाही असे का, बोला तुम्हाला हवे ते बोला. समस्या काय आहे? मला काही कळत नाही.

राहुल गांधी यांनी पश्चिमी देशांची मदत मागितली नाही, असेही पित्रोडा म्हणाले. सरदेसाई यांनी त्यांना प्रश्न विचारला की, राहुल गांधी म्हणाले होते की, अमेरिका आणि ब्रिटन हे देश भारतातील लोकशाहीच्या रक्षणासाठी काहीही करत नाहीत. त्यात पित्रोडा यांनी विचित्र उत्तर दिले. ते म्हणाले की, भारताची लोकशाही ही केवळ भारताची बाब नाही तर तो जगाचा प्रश्न आहे. तो केवळ हिंदुत्वाचा मुद्दा नाही तर मानवतेचा मुद्दा आहे.

हे ही वाचा:

धक्कादायक !! अमृता फडणवीस यांना धमकावून १ कोटीची लाच देऊ केली

भ्रष्टाचारविरोधी विभागाची राजन साळवी आणि कुटुंबियांकडे नजर

आधी जोरदार भूकंप.. आता न्यूझीलंडमध्ये त्सुनामीची भीती

राहुल गांधी आज येणार संसदेत, लंडनमधील भाषणाबद्दल बोलणार का?

राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली आहे, या मुद्द्यावर पित्रोडा यांना प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, राहुल गांधी काहीही चुकीचे बोलले नाहीत. उलट राहुल गांधी यांच्या बाबतीत नेहमीच गैरसमज होत असतात. राहुल गांधी असे काहीही बोललेले नाहीत ज्याबद्दल त्यांना माफी मागितली पाहिजे. जर एखाद्याला काही बोलावेसे वाटते तर त्याने ते बोलावे. वास्तव हे आहे की, राहुल गांधी जे काही बोलले ते कसे खोटे होते, प्रचारकी होते हे सांगितले गेले. चुकीची माहिती पसरवणे हेच आता भारतात होत आहे. दुर्दैवाने राहुल गांधी यांच्या बाबतच हे नेहमी होते.

Exit mobile version