काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा यांनी भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या स्थलांतरितांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांचे समर्थन केले असून ते गरीब बांगलादेशी कष्ट करून पैसे कमवायला भारतात येतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करू नये.
सध्या देशभरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा चांगलाच तापलेला असताना याकाळातचं सॅम पित्रोदा यांचे वक्तव्य आले आहे. देशभरात बांगलादेशी आणि रोहिंग्यांवर कारवाई सुरू असताना सॅम पित्रोदा म्हणतात की, गरीब आणि भुकेल्या स्थलांतरितांना त्रास देण्यापेक्षा ग्लोबल वॉर्मिंगसारख्या मुद्द्यांवर सरकारने अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये सॅम पित्रोदा असे म्हणताना दिसत आहेत की, “आम्ही आमच्या ग्रहाबद्दल (पृथ्वी) विचार करत नाही आहोत. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल काळजी करत नाही कारण, आम्ही स्थलांतरितांना त्रास देण्यात व्यस्त आहोत जे गरीब आणि भुकेले आहेत. ते (बांगलादेशी- रोहिंग्या घुसखोर) इथे येण्यासाठी खूप काम करतात. अर्थातच बेकायदेशीरपणे येतात; मला समजते की हे योग्य नाही, परंतु आम्ही बेकायदेशीर बांगलादेशी आणि अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यात व्यस्त आहोत. सर्वांना समाविष्ट करून घ्यायला हवे. आपले काही नुकसान होत असेल तरी चालेल. पण, कोणीही त्यांची संसाधने (बेकायदेशीर बांगलादेशींसोबत) सामायिक करू इच्छित नाही. प्रत्येकाला मोठा वाटा हवा असतो.”
हे ही वाचा :
जयपूरमध्ये ५०० रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांना अटक
महाकुंभला विमानाने जाताय? आता भरा ५० हजार
मजारवर रातोरात बेकादेशीर बांधकाम, भाजपाच्या तक्रारीनंतर मुस्लिमांनी स्वतःच तोडले!
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणामागे पुनर्विकास प्रकल्प? मुलाच्या जबाबात कंबोज आणि अनिल परब यांचा उल्लेख
सॅम पित्रोदा यांनी बांगलादेशींना भारतात स्वीकारण्याबाबत बोलून दिल्ली निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या हातात कोलीत दिले असून स्वतःसह पक्षालाही विरोधकांच्या रडारवर आणले आहे. सॅम पित्रोदा आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच वादात सापडतात. गेल्या वर्षी जूनमध्ये त्यांनी देशाच्या विविध भागात राहणाऱ्या भारतीयांबद्दल वर्णद्वेषी टिप्पणी केली होती, ज्यामध्ये त्यांनी ईशान्य भारतीयांना चिनी नागरिकांसारखे आणि दक्षिणेकडील लोक अरबांसारखे दिसत असल्याचे वर्णन केले होते.