देशभरात सध्या ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत असताना काँग्रेस नेते आणि गांधी परिवाराशी सलोख्याचे संबंध असलेले सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकातील काही दाखले समोर आले आहेत. ज्ञानवापी मशिदीबद्दलचे अनेक खुलासे त्यांनी या पुस्तकातून केले आहेत.
सलमान खुर्शीद यांचे पुस्तक ‘सनराइज ओवर अयोध्या- नेशनवूड इन अवर टाईम’ या सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकात ‘काशी विश्वनाथ टेंपल वाराणसी’ अशा नावाचा एक भाग असून यात त्यांनी काही खुलासे केले आहेत. वाराणसीमधील गंगा नदीच्या किनारी भगवान शिवाला समर्पित असं एक मंदिर हिंदू आस्थेच्या केंद्रात आहे. हे मंदिर फक्त बारा ज्योतिर्लिंगमध्ये नसून हिंदू लोकांच्या मानण्यानुसार सर्वात पवित्र अशी जागा आहे. ११२४ मध्ये मोहम्मद घोरी याने या मंदिराला नष्ट केले होते. नुकसान पोहचवले होते. त्यानंतर स्थानिक लोकांनी हे मंदिर पुन्हा बांधले. त्यानंतर ११९४ मध्ये कुतुबुद्दीन ऐबक आला आणि त्याने हे मंदिर पुन्हा तोडलं. १३५१ मध्ये दिल्लीचा सुलतान फिरोज शहा तुघलक याने या मंदिराची पुन्हा नासधूस केली. १६६९ मध्ये मुघल बादशाह औरंगझेब याने हे मंदिर पुन्हा उध्वस्त केलं आणि त्याजागी ज्ञानवापी मशीद बांधण्याचे आदेश दिले.
या मंदिराचा पुराणात उल्लेख असल्याचेही सलमान खुर्शीद यांनी लिहिले आहे. स्कंद पुराणाचा भाग असलेल्या काशी कंदमध्ये या मंदिराचा उल्लेख असल्याचे त्यांनी पुस्तकात लिहिले आहे. १६६९ मध्ये मंदिराच्या जागी मशीद बांधल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंदिराचे अवशेष मशिदीच्या इथे सापडतील असे पुस्तकात म्हटले आहे. अयोध्याचा निकाल आला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलं होतं त्याचा परिणाम ज्ञानवापीचा मुद्दा समोर आल्यावर होणार असल्याचे त्यांनी पुस्तकात म्हटले आहे.
हे ही वाचा:
‘या’ दिवशी अयोध्येतील राम मंदिर होणार भाविकांसाठी खुलं
गुंतवणूकदारांना एलआयसीने केले निराश
१९९३च्या मुंबई साखळी स्फोट प्रकरणी चौघे अटकेत
माथेरानमध्ये आता धावणार ई- रिक्षा
ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करताना १२ फूट ८ इंचाचे शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले आहे ते ठिकाण तात्काळ सील करावे आणि त्या ठिकाणी प्रवेश बंदी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अर्धे सर्वेक्षण बाकी असून आम्हाला दोन दिवसांचा वेळ द्यावा, अशी मागणी कोर्ट आयुक्तांनी न्यायालयात केली आहे. याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयीन आयुक्त अजय मिश्रा यांना हटवण्यात आले आहे. तसेच सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यासाठी इतर दोन आयुक्तांना दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.